AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | ‘या’ 4 राशीच्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती असते कमकुवत, लवकर आजारी पडतात, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

सध्या कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे (Zodiac Signs). कोरोना आणि इतर अनेक आजारांपासून वाचण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे अत्यंत महत्त्वाचं आहे.

Zodiac Signs | 'या' 4 राशीच्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती असते कमकुवत, लवकर आजारी पडतात, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल
Astrology
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 1:31 PM
Share

मुंबई : सध्या कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे (Zodiac Signs). कोरोना आणि इतर अनेक आजारांपासून वाचण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही लोकांना मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा आशीर्वाद मिळालेला असतो. तर काही लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते आणि त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये इतरांपेक्षा रोगांचे प्रमाण अधिक असते. आज आपण अशा 4 राशींवर नजर टाकू ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते (People With These Four Zodiac Signs Have The Weak Immune System ).

वृषभ राशी –

वृषभ राशीचे व्यक्ती नैसर्गिकरित्या निरोगी आणि सशक्त मानले जातात. परंतु ते बर्‍याचदा दूर्लक्ष करतात आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. ते हट्टी असतात आणि जर कोणीही त्यांना त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास सांगितले तर ते अशा सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात.

वृश्चिक राशी –

इतर राशींच्या तुलनेत वृश्चिक राशीच्या व्यक्ती आजाराप्रती अधिक संवेदनशील असतात आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते. जरी ते सहसा आजारी पडत नसतील, परंतु जेव्हा त्यांनी खबरदारी घेणे थांबवले, आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ओव्हरबोर्डवर जातात तेव्हा ते आजारी पडतात.

धनू राशी –

धनू राशीच्या व्यक्तींना प्रवास करणे आणि नवनवीन गोष्टींचा अनुभव घेणे त्यांना आवडत असल्याने त्यांना काही आजार होण्याची शक्यता जास्त असते. ते त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दलही खूप निष्काळजी आहेत आणि हेल्दी खाण्यावर विश्वास ठेवत नाहीत, यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

मीन राशी –

मीन राशीच्या व्यक्ती जास्त विचार करतात आणि लवकर चिंतेत पडतात. या सवयीमुळे, खबरदारी घेताना ओव्हरबोर्ड जाऊ शकतात आणि स्वत:ला तणावात आणू शकतात, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.

कोरोना संसर्गाच्या या काळात, प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी अधिकाधिक लक्ष देत आहे. ते खाण्यापिण्यापासून ते व्यायामापर्यंतच्या दिनचर्या पाळत आहेत.

People With These Four Zodiac Signs Have The Weak Immune System

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या चार राशीच्या व्यक्तींच्या पोटात कुठलंही गुपित राहत नाही, सिक्रेट सांगताना चारदा विचार करा

Zodiac Signs | या 4 राशीचे व्यक्ती असतात अत्यंत उदार, मित्रांना पैसे उधार देण्यापूर्वी दोनदा विचारही करत नाहीत

कोणत्या 4 राशीचे लोक वास्तववादी असतात, ज्यांचे पाय कायम जमिनीवर असतात?

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.