उद्यापासून 42 दिवस 5 राशींचं नशीब चमकणार, शुक्रावर राहणार मंगळाचा प्रभाव!

Shukra Gochar: २४ ऑक्टोबरपासून शुक्र ग्रह मंगळाच्या चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या बदलामुळे ५ राशींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

उद्यापासून 42 दिवस 5 राशींचं नशीब चमकणार, शुक्रावर राहणार मंगळाचा प्रभाव!
| Edited By: | Updated on: Oct 23, 2026 | 7:35 PM

शुक्र ग्रहाला ज्योतिषशास्त्रात धन, ऐश्वर्य, सुख-सुविधा आणि प्रेमसंबंधांचा कारक मानलं जातं. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्र स्वाती नक्षत्रातून चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार असून, ५ डिसेंबर २०२६ पर्यंत म्हणजेच सुमारे ४२ दिवस या नक्षत्रात राहणार आहे. चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ असल्यामुळे या काळात शुक्रावर मंगळाचा प्रभाव राहील, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा काळ कोणत्या राशींसाठी शुभ ठरू शकतो, जाणून घेऊया.

मेष

Loading...

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकतं. या काळात अचानक धन लाभ होऊ शकतो. आधी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीशी संबंधित अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन काम सुरू करण्याची किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळू शकते. आरोग्यातही सकारात्मक बदल जाणवू शकतात.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. दीर्घ काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच नवीन जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मिळणाऱ्या संधींचा योग्य वापर करणं महत्त्वाचं ठरेल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीशी संबंधित अडचणी कमी होतील. आर्थिक लाभाचे योग निर्माण होईल. वडिलांचं सहकार्य मिळाल्याने आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने मदत होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. मानसिक तणाव कमी होऊन आरोग्यात सकारात्मक बदल जाणवण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळू शकते. आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. व्यवसायात नफा मिळू शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते. या व्यक्तीच्या मदतीमुळे नोकरी किंवा व्यवसायात फायदा होऊ शकतो. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी नोकरी आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक ठरू शकतं. या काळात व्यक्तिमत्त्वात अधिक आकर्षक बदल जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळू शकतात. प्रवासातून फायदा होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. त्यामुळे करिअर, शिक्षण आणि वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us