AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचं संकट वाढतंय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती तुमच्याकडं असणं गरजेचं, वाचा सविस्तर

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. Mahatma Phule Jan Arogya Yojana

कोरोनाचं संकट वाढतंय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती तुमच्याकडं असणं गरजेचं, वाचा सविस्तर
महात्मा फुले जन आरोग्य योजना
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Apr 13, 2021 | 12:22 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. गेले काही दिवस दररोज 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 कोरोना सक्रिय कोरोना रुग्ण आढळतं आहेत. कोरोनावरील उपचार घेताना काही वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. रुग्णालयातील उपचाराचा खर्च भागवणं काही वेळा अडचणीचं ठरतं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी आपल्यला माहिती नसते त्यामुळे अनेकदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. मात्र, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऐनवेळी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते. ही धावपळ होऊ नये आणि योजनेचा लाभ व्हावा म्हणून आवश्यक कागदपत्रं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. (Maharashtra corona cases update Mahatma Phule Jan Arogya Yojana know details how to apply for scheme how to  search affiliated hospital )

जन आरोग्य योजनेतील तुमच्या जवळचं रुग्णालय कसं शोधणार?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या www.jeevandayee.gov.in वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या आरोग्य सेवा किंवा Health Service Near You या लिंकवर क्लिक करा. यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा. रुग्णालयाचा प्रकार निवडा आणि कोणत्या प्रकराचा उपचार घ्यायचा आहे ते निवडा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील योजनेशी संलग्नित रुग्णालयाची माहिती मिळेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात. रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळते.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये किती रुपयांचं विमा संरक्षण

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किती आणि कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कुणाला?

या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी 34 निवडक विशेष सेवा अंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला. 2020-21 या आर्थिक वर्षात डिसेंबर 2020 पर्यंत 93884 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

संबंधित बातम्या

EXCLUSIVE : कोरोना काळात रुग्णालयाकडून लुटालूट, खोटे रिपोर्ट दाखवून पैसे उकळ्याचे पुरावे, टोपे दखल घेणार?

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘या’ पोर्टलवर अर्ज करा, 31 डिसेंबर शेवटची तारीख

(Maharashtra corona cases update Mahatma Phule Jan Arogya Yojana know details how to apply for scheme)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...