AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालावरच्या मुलांच्या शिक्षणासाठी आधुनिक सावित्रीची धडपड, पोलीस कॉन्स्टेबल संगीता ढोलेंचा प्रवास प्रकाशाकडे उपक्रम

महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांनी सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम सुरु केलेय. Sangeeta Dhole teaching

पालावरच्या मुलांच्या शिक्षणासाठी आधुनिक सावित्रीची धडपड, पोलीस कॉन्स्टेबल संगीता ढोलेंचा प्रवास प्रकाशाकडे उपक्रम
संगिता ढोले, पोलीस कॉन्स्टेबल, वाशिम
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 07, 2021 | 3:08 PM
Share

वाशिम: राज्यात सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान राबवलं जाते. कोट्यवधी रुपये शिक्षणावर खर्च केले जात आहेत. तरीही अजून अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. मात्र, वाशिम पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांनी सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्यापलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम त्या करत आहेत.त्यांमुळं या पालावरील मुलांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसून येत आहे. (Washim Police Constable Sangeeta Dhole teach the children’s  from lockdown)

लॉकडाऊनपासून प्रवास प्रकाशाकडे उपक्रम सुरु

वाशिम शहरालगत पोटासाठी भटकंती करणाऱ्या समाजातील लोकांनी पाल टाकले आहेत. लॉकडाऊन दरम्यान संगीता यांची जवळच असलेल्या चेकपोस्टवर ड्युटी लागली. येता-जाता त्या पालावरील मुलांना बघत. संगीता यांनी या मुलांना एकत्र करून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली. कर्तव्याबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी स्वखर्चाने मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन लागल्यापासून संगीता ढोले प्रवास प्रकाशाकडे या उपक्रमांतर्गत ज्ञानदानाचं काम करत आहेत. शिक्षणाला वाघिणीचे दुध म्हटले जाते. शिक्षण मिळाले की, व्यक्तीची, त्याच्या कुटुंबाची व समाजाची प्रगती होते. मात्र, आजही आपल्या देशातील अनेक घटक शिक्षणापासून वंचित आहेत. सामाजिक जबाबदारीचे भान असल्यानं मुलांना शिकवण्याचं काम करते, असं संगीता ढोले सांगतात.

भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी धडपड

समाजातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही भटकंती करणाऱ्या समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच असल्याचे पहायला मिळते. या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील एक आधुनिक सावित्री धडपड करत आहे. संगीता ढोले असे त्यांचे नाव असून त्या वाशिम पोलीस दलात कार्यरत आहेत. संगीता ढोले यांच्या प्रयत्नामुळे पालावर गेल्या वर्षभरापासून बाराखडीचा आवाज घुमत आहे. शिक्षण मिळाल्याने मुलांना अक्षराची, एबीसीडीची ओळख झाली. आता ही मुले शिकून मोठ्या नोकरीवर जाण्याची स्वप्न बघत आहेत. तर पालकांनाही आपल्या पाठीशी कुणीतरी असल्याचा आनंद आहे. मुलांना शिक्षण मिळाल्याने समाज सुधारेल, अशी आशा पालकांना आहे.

संबंधित बातम्या:

Women’s Day Special Video: महिंद्राच्या या जाहिरातीची देशभर चर्चा, आसान होता तो हर कोई किसान होता!

लोकचळवळ : सावित्रीबाईंच्या जयंतीला उत्सवाचं रुप देणारी चळवळ, काय आहे इतिहास?

(Washim Police Constable Sangeeta Dhole teach the children’s from lockdown)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...