Chandra Gochar: आजपासून या 3 राशींचे अच्छे दिन सुरू! राहू-चंद्राच्या युतीमुळे मिळेल आनंदाची बातमी
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीत राहू आणि चंद्राच्या युतीमुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. या ग्रहस्थितीमुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. जाणून घ्या या राशी कोणत्या.

२१ ऑक्टोबर २०२६ रोजी कुंभ राशीत चंद्राचा प्रवेश झाल्याने राहू आणि चंद्राची युती निर्माण झाली आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना आणि मानसिक स्थितीचा, तर राहूला अचानक घडणाऱ्या घटना आणि अनपेक्षित बदलांचा कारक मानले जाते. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीकडे ज्योतिषीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाने पाहिले जाते. या ग्रहस्थितीचा काही राशींच्या वैयक्तिक आयुष्यावर, नोकरीवर, व्यवसायावर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. काही व्यक्तींना रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते, तर काहींच्या आर्थिक अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. या काळात नोकरीतील बदल, व्यवसायाचा विस्तार आणि जुन्या आर्थिक व्यवहारांबाबत सकारात्मक घडामोडी घडू शकतात.
मेष
अनपेक्षित फायदा होऊ शकतो. या काळात एखादी आनंदाची बातमी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायातही काही सकारात्मक बदल घडतील. मानसिक ताण कमी होऊन रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. तसेच, प्रवासातून लाभ होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
या काळात आर्थिक परिस्थितीत अनपेक्षित सुधारणा होऊ शकते. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. नोकरीशी संबंधित अडचणी हळूहळू कमी होतील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. त्यांच्या मदतीने एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. गुंतवणुकीच्या काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात. योग्य विचार करून त्यांचा फायदा घेता येऊ शकतो.
धनु
कुठे पैसे अडकले असतील, तर ते अचानक परत मिळू शकतात. कामाशी संबंधित ताण कमी होऊन कार्यक्षेत्रात चांगले परिणाम दिसू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे. या काळात कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नशिबाची साथ मिळाल्याने काही रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. व्यवसायातील परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक अडचणीही दूर होतील. महत्त्वाच्या कामांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे फायदेशीर ठरू शकते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)