
आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे बेडरुम. वास्तूशास्त्रा जसे घराबद्दल काही गोष्टींबद्दल सांगितलेले असते तसेच ते बेडरुमबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या ज्यामुळे नातसंबंधावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही किंवा वास्तूदोष निर्माण होणार नाही. बेडरुमची जागा योग्य नसेल तर आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. यामुळे नवरा-बायकोच्या नात्यात दूरावा येतो. वास्तूदोष निर्माण झाल्यामुळे मन देखील अशांत राहाते. जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की, झोपताना या गोष्टी पलंगाच्या जवळ ठेवल्याने नकारात्मकता वाढते. त्यामुळे जाणून घेऊया बेडरुममधील बेडजवळ काही गोष्टी ठेवू नये.
बेडसाठी वास्तु टिप्स:
वास्तुशास्त्रानुसार, घरातील सर्व खोल्यांची दिशा योग्य असावी. या खोल्यांमधील वस्तू देखील व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे बेडरूमबद्दल देखील बऱ्याच गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते. वास्तुशास्त्रानुसार बेडमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम होतो. आपल्याला बेडरूममध्ये सकारात्मक उर्जेची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यावर अनेक प्रकारे परिणाम करते. एकीकडे, बेडरूममध्ये बेडची दिशा योग्य असणे सर्वात महत्वाचे असते. तर दुसरीकडे, आपण काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच त्या वस्तू बेडरूममध्ये ठेवणे कधीही चांगलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात की बेडरुममधील बेडजवळ कोणत्या गोष्टी ठेवू नये.
बेडजवळ या गोष्टी ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, बेडच्या अगदी समोर आरसा कधीही नसावा. त्याचा नातेसंबंधांवर वाईट परिणाम होतो. जर बेडरूममध्ये अशा प्रकारे आरसा ठेवला असेल तर तो झाकण्याचा प्रयत्न करावा. तसेच बेडजवळ झाडू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पाण्याच्या बाटल्या आणि रिकामे कप ठेवणे देखील योग्य नाही. शास्त्रानुसार, बेडजवळ ठेवलेला ड्रॉवर बऱ्याच गोष्टींनी भरलेला नसावा. तसेच, चाकू आणि कात्रीसारख्या तीक्ष्ण वस्तू देखील बेडजवळ ठेवणे टाळावे. तसेच, बेडजवळ अन्नपदार्थ देखील ठेवू नयेत. तसेच बेडवर बसून कधीही अन्न खाऊ नये.
बेडची दिशा कोणती असावी?
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या पलंगाची दिशा चुकीच्या दिशेने असेल तर मानसिक ताण वाढण्याची शक्यता असते. शास्त्रांनुसार, पलंगाचे डोके नेहमीच दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे. तसेच, पलंगाची उंची जास्त नसावी. मुख्य गोष्ट म्हणजे पलंगाजवळ कोणतीही वस्तू ठेवू नये. सहसा लोक पलंगाखाली बूट, चप्पल, चटई किंवा जुन्या वस्तू ठेवतात. असे करणे टाळावे. असे मानले जाते की असे केल्याने घरात कटकट, वाद होतात. तसेच आपली कामेही रखडू लागतात. त्यामुळे शक्यतो बेडजवळची जागा, बेडखालील जागा स्वच्छ असावी असा प्रयत्न करावा.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )