Feng Shui : आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत, कर्जही फिटेल, फक्त घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू

फेंग शुई हे देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच एक शास्त्र आहे. फेंग शुईचा उगम हा चीनमध्ये झाला, मात्र त्यानंतर हळुहळु त्याचा प्रसार सर्व जगभरात झाला. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी फेंग शुईमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जगातल्या अनेक देशांमध्ये हे उपाय केले जातात.

Feng Shui : आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत, कर्जही फिटेल, फक्त घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू
Feng Shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 9:21 PM

फेंग शुई हे एक वास्तुशास्त्राप्रमाणेच एक शास्त्र आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या असू नये? याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलंच आहे. तसेच जर घरात काही समस्या असतील तर त्यावर उपाय देखील सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फेंग शुईमध्ये देखील असेच काही सोपे -सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेक लोकं असे असतात जे दिवस रात्र प्रचंड कष्ट करतात, खूप पैसा कमवतात परंतु त्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही. तसेच काही लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी ते आपल्यावरील कर्ज फेडू शकत नाहीत. यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. फेंग शुई देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा या दोन मुख्य घटकांवरच आधारीत आहे. चला तर मग या उपायाबद्दल जाणून घेऊयात.

घरात ठेवा कासवाची मूर्ती – फेंग शुई शास्त्र आणि चीनमध्ये कासवाला खूप शुभ मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये देखील कासवाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात तर सर्वात आधी तुम्हाला तिथे देवापुढे कासवाची मूर्ती दिसते. हिंदू धर्मामध्ये कासव हे नम्रतेतचं प्रतिक आहे. तर दुसीकडे फेगं शुई शास्त्रामध्ये कासवाला दीर्घायुष्य, सकारात्मकता आणि ऊर्जेचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे फेंग शुई शास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींचा नाश होतो. घरात सुख समृद्धी येते. जर पती-पत्नीमध्ये सारखी भांडणं होत असतील, एकमेकांसोबत पटत नसेल तर तो देष देखील दूर होतो, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

कासवाच्या मूर्तीसोबतच तुम्ही तुमच्या घरात हत्तीची मूर्ती देखील ठेवू शकतात. फेगं शुईमध्ये हत्तीला समृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं प्रतिक मानलं जातं. घरात हत्तीची मूर्ती ठेवल्यामुळे उत्तम आरोग्य लाभतं, त्याचप्रमाणे घरात शातंता आणि समृद्धी येते, असं मानलं जातं. त्यामुळे अनेकजण आपल्या घरात हत्तीची मूर्ती ठेवतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us