Ganga Saptami : गंगा सप्तमीला केलेल्या या उपायांमुळे दूर होतो पितृदोष, मिळते अश्वमेध यज्ञाचे फळ

असे मानले जाते की वैशाख शुक्ल पक्षाच्या सप्तमीला भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलातून गंगेचा जन्म झाला आणि भगवान शिवाने गंगा आपल्या जटांमध्ये धारण केली होती.

Ganga Saptami : गंगा सप्तमीला केलेल्या या उपायांमुळे दूर होतो पितृदोष, मिळते अश्वमेध यज्ञाचे फळ
गंगा जयंती
Image Credit source: Social Media
Nitish Gadge | Updated on: Apr 25, 2023 | 7:39 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख शुक्ल पक्षातील सप्तमीला गंगा सप्तमी (Ganga Saptami 2023) साजरी केली जाते. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, वैशाख शुक्ल पक्षाच्या सप्तमीला, भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडातून गंगा प्रकट झाली, म्हणून या दिवशी गंगा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गंगा सप्तमी 27 एप्रिल रोजी साजरी केली जाईल, तर यावर्षी सप्तमी 26 आणि 27 एप्रिल या दोन्ही दिवशी असेल, परंतू गंगा सप्तमी साजरी करण्याचा मुख्य दिवस 27 एप्रिल आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गंगा सप्तमीच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ कार्य केल्याने आपल्याला विशेष फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगेच्या घाटावर स्नान करून पितरांना जल अर्पण करणे, दानधर्म करणे इत्यादी केल्याने अनेक पटींनी लाभ होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार गंगा सप्तमीला गंगेत स्नान करून पितरांना गंगाजल अर्पण करणे आणि त्यांच्यासाठी कोणतेही कार्य करणे हा अत्यंत शुभ  मानले जातो. भगीरथने आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी गंगा  पृथ्वीवर आणण्यासाठी तपश्चर्या केली, त्यानंतर त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळाली.

शुभ मुहूर्त

गंगा सप्तमी 27 एप्रिल रोजी संपूर्ण देशात साजरी केली जाणार आहे. गंगा सप्तमीच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या हितासाठी कोणतेही काम केल्यास विशेष फळ मिळते. गंगा सप्तमीचा शुभ मुहूर्त 26 एप्रिल रोजी सकाळी 11.27 पासून सुरू होईल आणि 27 एप्रिल रोजी दुपारी 1.38 पर्यंत राहील. या दरम्यान गंगेच्या घाटावर जाऊन पितरांचे कार्य केल्याने अनेक फायदे होतात. गंगा सप्तमीच्या दिवशी स्नान, ध्यान आणि दान केल्याने गंगा माता त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.

गंगा जयंती

गंगा सप्तमीला गंगा जयंती देखील म्हणतात. असे मानले जाते की वैशाख शुक्ल पक्षाच्या सप्तमीला भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलातून गंगेचा जन्म झाला आणि भगवान शिवाने गंगा आपल्या जटांमध्ये धारण केली होती. त्यानंतर, भगीरथने भगवान भोलेनाथांची पूजा करून प्रसन्न झाल्यावर आपले केस उघडले आणि गंगेचा प्रवाह पृथ्वीवर वाहू दिला, जेणेकरून मानवाचे कल्याण होईल. माता गंगा पृथ्वीवर येण्याचा मुख्य उद्देश भगीरथच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी हा होता, म्हणजेच गंगा सप्तमीच्या दिवशी पितरांसाठी कोणतेही कार्य केल्यास मनुष्याला अनेक पटींनी फळ मिळते.

अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते

जी व्यक्ती गंगा सप्तमीला गंगा मातेची पूजा करते आणि पिंडदान, तर्पण, दान इत्यादी कोणतेही कार्य करते, त्याला त्याचे हजारपट फळ मिळते. धार्मिक ग्रंथांनुसार जो गंगा सप्तमीला आपल्या पितरांसाठी कोणतेही कार्य करतो, त्याला अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळते. गंगा सप्तमीच्या दिवशी पितरांसाठी शुद्ध चित्ताने आणि नि:स्वार्थ भावनेने केलेल्या कार्याचे फळ तर मिळतेच, शिवाय पितरांचा आशीर्वादही सदैव राहतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us