देशातील एकमेव मंदिर जिथे जिवंतपणीच… तीन दिवस गुप्तपणे… काय घडतं?

गया येथील जनार्दन मंदिर देशातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे जिवंतपणीच आत्मश्राद्ध केले जाते. पितृपक्षात या अनोख्या परंपरेनुसार, ज्यांना संतान नाही किंवा पितृदोषापासून मुक्ती हवी आहे, असे लोक मृत्यूपूर्वी स्वतःच पिंडदान करतात. यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि मृत्यूनंतर पिंडदान करण्याची गरज भासत नाही, अशी मान्यता आहे.

देशातील एकमेव मंदिर जिथे जिवंतपणीच... तीन दिवस गुप्तपणे... काय घडतं?
Pind Daan Gaya
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 5:41 PM

सध्या पितृपक्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून पिंडदान आणि श्राद्ध कर्म केलं जात आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून श्राद्ध कर्माला सुरुवात होते. तसेच अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथी म्हणजे सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाचा समारोप होतो. साधारणपणे पितृपक्षात दिवंगत नातेवाईकांसाठी पिंडदान केलं जातं. पण देशात असं एक मंदिर आहे, जिथे जिवंत लोक स्वत:चंच पिंडदान करतात. त्यामुळेच हे मंदिर वेगळं आणि अनोखं आहे. जिवंत असतानाच पिंडदान करण्याची ही पंरपरा हजारो वर्ष जुनी आहे. आजही ही परंपरा अत्यंत श्रद्धेने पार पाडली जाते.

बिहारमध्ये हे मंदिर आहे. जनार्दन मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. गयाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर भस्मकूट पर्वतावर आहे. या मंदिरात भगवान विष्णू जनार्दन स्वरुपात विराजमान आहेत. पितृपक्षाच्या काळात या ठिकाणी श्रद्धाळूंची मोठी गर्दी होते. मृत्यूच्या पूर्वीच पिंडदान केलं जाणारं जनार्दन मंदिर हे देशातील एकमेव मंदिर आहे.

Loading...

म्हणून पिंडदान करतात

या ठिकाणी पिंडदान करण्याचं कारण अत्यंक वेगळंच आहे. ज्या लोकांना संतान नसते किंवा ज्यांच्या कुटुंबात पिंडदान करणारं कोणी नसतं, असे लोक मृत्यूपूर्वी या अनोख्या मंदिरात पिंडदान करतात. ज्या लोकांचं कुटुंब असतं, मुलं असतात, पण जे लोक वैराग्य पत्करतात किंवा संन्यास घेतात ते लोकही या मंदिरात येऊन पिंडदान करतात. जर कुणाचं पिंडदान किंवा तर्पण नाही केलं तर त्यांचे आत्म भटकतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. गयाच्या जनार्दन मंदिरात भगवान विष्णू स्वत: पिंड ग्रहण करतात. या ठिकाणी पिंडदान केल्याने आत्म्याला मुक्ती मिळते, अशी सुद्धा मान्यता आहे.

मृत्यूनंतर पिंडदानाची गरज नाही

या ठिकाणी आणखी एक अनोखी मान्यता आहे. ती म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीने जिवंत असतानाच श्राद्ध किंवा पिंडदान केलं तर मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला अनुष्ठान करण्याची गरज पडत नाही. असं केल्याने व्यक्तीचा पितृदोष संपुष्टात येतो. मृत्यूनंतर आत्म्याला यमलोक किंवा अन्य लोकांमध्ये कष्ट सहन करावे लागत नाही. गयामध्ये सुमारे 54 पिंडदेवी आणि 53 पवित्र स्थळ आहेत. या ठिकाणी पितरांचं पिंडदान होतं, पण जिवंतपणीच पिंडदान करण्यात येणारं जनार्दन मंदिर वेदी संपूर्ण जागतील एकमेव मंदिर आहे.

तीन दिवस आत्मश्राद्ध

या ठिकाणी तीन दिवस गुप्तपणे आत्मश्राद्ध केलं जातं. आधी गयात आल्यावर वैष्णव सिद्धीचा संकल्प केला जातो. पापांचं प्रायश्चित केलं जातं. त्यानंतर जनार्दन स्वामी मंदिराता संपूर्ण विधी विधानाने पूजा अर्चा केली जाते. जप केला जातो. दही, तांदूळ आणि 5 पिंड देवाला आर्पित केले जातात. यात तिळाचा वापर केला जात नाही. यावेळी पिंडदान करणारा श्रद्धाळू देवाकडे प्रार्थना करून मोक्षाची विनंती करतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us