AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalashtami 2023 :  ही आहेत काल भैरवाची प्रसीद्ध मंदिरे, जिथे दर्शन केल्याने दुर होते भक्तांची सर्व संकटे

कालाष्टमीच्या दिवशी शिव भक्त भगवान भैरवाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतात आणि विधीवत त्यांची पूजा करतात. असे मानले जाते की यामुळे माणसाची सर्व भीती दूर होते आणि जीवनात प्रगती होते.

Kalashtami 2023 :  ही आहेत काल भैरवाची प्रसीद्ध मंदिरे, जिथे दर्शन केल्याने दुर होते भक्तांची सर्व संकटे
कालभैरवImage Credit source: Social media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 13, 2023 | 7:31 PM
Share

मुंबई : प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कालाष्टमी (Kalashtami) म्हणून साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शंकराच्या उग्र रूपांपैकी एक असलेल्या भगवान भैरवाची (Kalbhairava) विशेष पूजा केली जाते. याशिवाय कालाष्टमीच्या दिवशी उपवास ठेवण्याचीही प्रथा आहे. या दिवशी शिव भक्त भगवान भैरवाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतात आणि विधीवत त्यांची पूजा करतात. असे मानले जाते की यामुळे माणसाची सर्व भीती दूर होते आणि जीवनात प्रगती होते. पंचांगानुसार, भगवान भैरवांच्या विशेष पूजेची तिथी म्हणजेच कालाष्टमी 13 एप्रिल 2023 रोजी पहाटे 03:44 पासून सुरू होईल आणि 14 एप्रिल 2023 रोजी पहाटे 01:34 वाजता समाप्त होईल.

असे मानले जाते की देशभरात भगवान भैरवाची काही प्रसिद्ध मंदिरे आहेत जिथे शिवाचे उग्र रूप पाहून भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही नकारात्मक उर्जेची भीती वाटत असली तरी या मंदिरात जाणे शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया भगवान भैरवाच्या या प्रसिद्ध मंदिरांबद्दल.

काल भैरव मंदिर, वाराणसी

गंगेच्या तीरावर वसलेले सर्वात जुने शहर वाराणसी येथे स्थित कालभैरवाचे हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि चमत्कारी मानले जाते. येथे भगवान भैरव काशीचे कोतवाल म्हणून पूजले जातात. महादेवाच्या पवित्र निवासस्थानापासून म्हणजेच बाबा विश्वनाथ मंदिरापासून या मंदिराचे अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे. भैरवजींच्या या मंदिरात त्यांची मूर्ती काळ्या रंगाची आहे, तिचा रोजचा आरास पाहण्यासारखा आहे.

बटुक भैरव मंदिर, नवी दिल्ली

राजधानी दिल्लीच्या विनय मार्गावर असलेल्या भगवान भैरवाच्या या मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे. या मंदिरात बाबा भैरवाची मूर्ती विहिरीच्या वर विराजमान आहे. पौराणिक मान्यतेनुसार ही मूर्ती पांडव भीमसेन यांनी काशीहून आणली होती.

काल भैरव मंदिर, उज्जैन

धार्मिक मान्यतेनुसार, उज्जैन महानगरात वसलेल्या या कालभैरव मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे. कालभैरवाच्या या मंदिरात न गेल्यास महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते, असे म्हटले जाते. भगवान भैरवाच्या या मंदिरात त्यांना विशेषत: मद्य अर्पण केले जाते.

किलकारी भैरव, दिल्ली

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाणारे भगवान किलकारी भैरवाचे हे मंदिर राजधानी दिल्लीतही आहे. धार्मिक मान्यतेनुसार या मंदिराची स्थापना महाभारत काळात झाली.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट