उद्यापासून या 3 राशींच्या आयुष्यात होणार सकारात्मक बदल; बुधाची वक्री चाल ठरणार खास
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाच्या हालचालीचा परिणाम व्यक्तीच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो. 24 ऑक्टोबरपासून बुधाच्या वक्री भ्रमणाला सुरुवात होणार असून, या ग्रहस्थितीमुळे काही लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

बुध ग्रह २४ ऑक्टोबर २०२६ पासून तूळ राशीत वक्री होणार असून, ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रह स्थितीचा परिणाम नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि संवादावर होऊ शकतो. या काळात काही राशींना जुन्या कामांमधून फायदा मिळण्याची, रखडलेली कामं मार्गी लागण्याची किंवा करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेष, कर्क आणि वृश्चिक या तीन राशींसाठी बुधाची वक्री चाल कशी ठरू शकते, जाणून घेऊया.
मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित जुन्या संपर्कांमधून महत्त्वाची माहिती मिळू शकते. पूर्वी केलेले प्रयत्न उपयोगी ठरण्याची शक्यता असून, एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतो. रखडलेली व्यावसायिक चर्चा पुढे जाण्याचीही शक्यता आहे. मात्र, कोणताही करार स्वीकारण्यापूर्वी त्यातील अटी नीट तपासून निर्णय घेणं आवश्यक ठरेल.
कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात स्वतःची स्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची अपेक्षा असणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी जुन्या ग्राहकांशी पुन्हा चर्चा करणं फायदेशीर ठरू शकतं. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना आपल्या योजनांचा पुन्हा आढावा घेता येईल. मात्र आर्थिक बाबतीत खर्चाचं नियोजन करणं महत्त्वाचं ठरेल.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना रखडलेली कामं पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना पूर्वी केलेल्या अर्जातून किंवा जुन्या संपर्कातून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी प्रलंबित पेमेंट आणि अपूर्ण व्यवहारांकडे लक्ष द्यावं. घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं फायदेशीर ठरू शकतं. मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित माहितीची खात्री करून घेणं आवश्यक आहे.
किती दिवस वक्री राहणार बुध?
ज्योतिषीय गणनेनुसार, बुध २४ ऑक्टोबर २०२६ रोजी तूळ राशीत वक्री होईल आणि १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्गी होईल. या काळात जुन्या कामांचा आढावा घेणं, महत्त्वाची कागदपत्रं काळजीपूर्वक तपासणं आणि आर्थिक व्यवहार करताना सावध राहणं योग्य मानलं जातं.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)