नवरात्र सुरू होताच ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन! धन-करिअरमध्ये मिळेल फायदा
Navratri 2026: यंदा ११ ऑक्टोबरपासून नवरात्राला सुरुवात होत आहे. नवरात्राच्या काळात काही राशींवर ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा शुभ प्रभाव पडू शकतो. त्यामुळे ‘या’ ४ राशींसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत हा काळ खास ठरण्याची शक्यता आहे.

ग्रहांच्या हालचाली आणि नवरात्राचा शुभ काळ यामुळे ऑक्टोबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विशेष ठरणार आहे. यंदा ११ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार असून, या नऊ दिवसांत ग्रहांच्या स्थितीतही काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. नवरात्रापूर्वी ३ ऑक्टोबरला शुक्र वक्री, १७ ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश आणि २४ ऑक्टोबरला बुध वक्री होणार आहे. तसेच ३१ ऑक्टोबरला गुरुचे राशी परिवर्तन होणार आहे. यामुळे नवरात्राचा काळ खास मानला जात आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, या ग्रहस्थितीचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. काही जणांसाठी नोकरी-व्यवसायात नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे, तर काहींना आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत दिलासा मिळू शकतो. विशेषतः सिंह, कन्या, मकर आणि मीन राशींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो.
सिंह : करिअरमध्ये नवीन जबाबदारी
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नवरात्राचा काळ करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता असून, मेहनतीची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. प्रमोशन किंवा नोकरीतील बदलाची प्रतीक्षा करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात जुन्या संपर्कांचा फायदा होण्याचे संकेत आहेत. मात्र, उत्पन्न-खर्चाचे संतुलन राखणे महत्त्वाचे राहील.
कन्या : आर्थिक स्थितीत सुधारणा
कन्या राशीसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता असून, व्यवसायातील जुने व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. रखडलेले पैसे मिळण्याचे संकेतही आहेत. बराच काळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागू शकतात. विद्यार्थ्यांसाठीही मेहनत आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे.
मकर : रखडलेल्या कामांना गती
मकर राशीच्या व्यक्तींच्या रखडलेल्या कामांना नवरात्रात गती मिळू शकते. नोकरीत नवीन जबाबदारी, तर व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जुने ग्राहक आणि संपर्क पुन्हा उपयोगी ठरू शकतात. आर्थिक बाबतीतही काहीसा दिलासा मिळू शकतो. आपल्या योजना सर्वांसोबत शेअर करण्याऐवजी त्यावर शांतपणे काम करावे.
मीन : करिअरमध्ये बदलांचे संकेत
मीन राशीसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीत नवीन भूमिका किंवा जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संधी मिळू शकतात. दुसऱ्या शहराशी किंवा परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा हेतू नाही.)