Navratri Gift Idea: नवरात्रीत कन्या पूजनाला द्या हे सुंदर गिफ्ट, लहान मुली होतील खुश

नवरात्रीमध्ये अष्टमी, नवमीला कन्या पूजन केले जाते. यावेळी त्यांना काही गिफ्ट दिले जातात. यंदाच्या कन्या पूजनाला मुलींना देण्यासाठी तुम्हाला या गिफ्ट आयडिया उपयोगी पडतील.

Navratri Gift Idea: नवरात्रीत कन्या पूजनाला द्या हे सुंदर गिफ्ट, लहान मुली होतील खुश
| Edited By: | Updated on: Oct 14, 2026 | 5:31 PM

Kanya Pujan Gift Idea: नवरात्रीचा आठवा दिवस महाअष्टमी आणि नववा दिवस महानवमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलींना घरी बोलवून त्यांचे पूजन केले जाते. काही लोक कन्या पूजन अष्टमीला तर काही लोक नवमीला करतात. या पूजनमध्ये केवळ त्यांना प्रसाद दिले जात नाही तर गिफ्ट सुद्धा दिले जातात. दरवर्षी लहान मुलींना काय गिफ्ट द्यावे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर हे आयडिया तुमची मदत करतील. नेहमीच्या वस्तू देण्याऐवजी तुम्ही मुलींना उपयोगी पडतील असे, त्यांच्या रोजच्या वापरातील काही गोष्टी देऊ शकता.

स्टडी किट
हा एक चांगला आणि उपयोगी पर्याय ठरू शकतो. या किटमध्ये पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, कलर्स आणि इतर स्टेशनरीच्या वस्तू ठेवता येतील. मुलींना शाळेत या वस्तूंचा नियमित वापर करता येईल. बाजारात वेगवेगळ्या आकारांचे आणि डिझाइनचे रेडीमेड स्टडी किटही उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार सुंदर किट घेता येईल.
लंच बॉक्स
रंगीबेरंगी आणि आकर्षक डिझाइनचे लंच बॉक्स लहान मुलांना आवडतात. कन्या पूजनाला मुलींना लंच बॉक्स गिफ्ट केल्यास त्याचा शाळेत रोज वापर करता येऊ शकतो. बाजारात कार्टून कॅरेक्टर, रंगीबेरंगी प्रिंट आणि वेगवेगळ्या आकारांचे लंच बॉक्स उपलब्ध आहेत. तुम्ही मुलींच्या वयानुसार योग्य आकाराचा डबा निवडू शकता. बजेट कमी असेल, तर साधा आणि टिकाऊ लंच बॉक्सही चांगला पर्याय ठरू शकतो.
हेअर अॅक्सेसरीज
लहान मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर अॅक्सेसरीज वापरायला आवडतात. त्यामुळे कन्या पूजनासाठी हेअर क्लिप, रंगीबेरंगी हेअर बँड, रबर बँड आणि सुंदर हेअर बो यांचा सेट भेट देता येईल. बाजारात फुलांच्या आकारातील, कार्टून डिझाइनमधील आणि विविध रंगांतील अॅक्सेसरीज सहज मिळतात. तुम्ही या वस्तू एका छोट्या गिफ्ट बॉक्समध्ये ठेवून आकर्षक पद्धतीने भेट देऊ शकता.
लाल वस्त्र आणि बांगड्या
नवरात्रीमध्ये लाल रंगाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यामुळे कन्या पूजनावेळी मुलींना लाल रंगाची चुनरी, सुंदर ड्रेस किंवा लाल रंगाचे वस्त्र भेट देता येईल. यासोबत रंगीबेरंगी बांगड्या किंवा कंगनचा सेटही देऊ शकता. मुलींचे वय आणि आवड लक्षात घेऊन कापडाची निवड करा.
सॉफ्ट टॉय
लहान मुलांना टेडी बेअर आणि इतर सॉफ्ट टॉय खूप आवडतात. त्यामुळे कन्या पूजनला सॉफ्ट टॉय भेट देणे हा आनंददायी पर्याय ठरू शकतो. बाजारात टेडी बेअर सोबतच अनेक प्राणी, विविध कार्टून पात्रांच्या आकारातील सॉफ्ट टॉय उपलब्ध आहेत. मुलींना आवडतील असे सॉफ्ट टॉय निवडा.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us