राहुच्या नक्षत्रात सूर्याचं गोचर! 4 राशींना आर्थिक लाभ, नात्यांमध्ये वाढणार गोडवा

Surya Gochar: 24 ऑक्टोबरला सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार असून, या बदलामुळे 4 राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, या राशींच्या लोकांना नातेसंबंधांमध्येही आनंद आणि सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतो.

राहुच्या नक्षत्रात सूर्याचं गोचर! 4 राशींना आर्थिक लाभ, नात्यांमध्ये वाढणार गोडवा
राहूच्या नक्षत्रात सूर्याचं गोचर
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 14, 2026 | 10:06 PM

येत्या काही दिवसांत ग्रहांच्या स्थितीत महत्त्वाचा बदल होणार आहे. २४ ऑक्टोबरला सूर्य आपलं नक्षत्र बदलून स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सध्या सूर्य चित्रा नक्षत्रात विराजमान असून, या नक्षत्राचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला जातो. १० दिवसांनंतर सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, स्वाती नक्षत्राचा स्वामी राहु आहे. त्यामुळे सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचं मानलं जात आहे. या गोचरचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी ४ राशींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. या राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती आणि वैयक्तिक नात्यांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. सूर्याच्या या नक्षत्र बदलाचा कोणत्या राशींवर परिणाम होणार हे जाणून घ्या.

मिथुन

Loading...

मिथुन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. कामातील आळस दूर होऊन काम करण्याचा उत्साह वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल. आर्थिक लाभाचे योग असून, व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते. कुटुंबीयांची साथ मिळाल्याने नाते अधिक दृढ होईल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात नशिबाची साथ मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने दिलासा मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मेहनत आणि सातत्य कायम ठेवल्यास पदोन्नतीच्या संधीही निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांची व्यावसायिक आयुष्यात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि मान-सन्मान वाढेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे नात्यांमधील दुरावा कमी होईल. आर्थिक लाभाचे योग असून, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी एखादी चांगली संधी किंवा ऑफर मिळेल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या काळात एखादा प्रवास घडून त्यातून फायदा मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात आनंदाची बातमी मिळू शकते. व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल जाणवू शकतात. आत्मविश्वास वाढल्याने नवीन कामे हाती घेण्याची प्रेरणा मिळेल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us