Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग शुक्रवारी करा हे खास उपाय, लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने होईल धनाचा वर्षाव
अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते प्रचंड कष्ट करतात, खूप पैसा कमवतात. परंतु तो पैसा त्यांच्या हातात टिकत नाही. कोणत्या नं कोणत्या कारणांमुळे खर्च होतो. घरात आलेला पैसा टिकावा, धनामध्ये वृद्धी व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल माहिती जाणून घेऊ.

अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की असे लोक पैसे कमावण्यासाठी प्रचंड कष्ट करतात. दिवस रात्र मेहनत घेतात. त्यांच्याकडे पैसा येतो देखील परंतु तो त्यांच्या हातात टिकत नाही. कोणत्या न कोणत्या कारणांमुळे पैसा खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी बँक अकाऊंट रिकामं होतं? हातात आलेला पैसा का आणि नेमका कसा खर्च होतो? तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. वास्तुदोष म्हणजे नक्की काय? तर जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा कमी होऊन, नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्या वाढतं, त्यालाच वास्तुदोष असं म्हणतात. जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा मोठा फटका हा तुम्हाला बसू शकतो. जसं की काहीही कारण नसताना घरात सारखे भांडणं होतात. तुम्ही कितीही कष्ट करा तुमच्या हातात पैसा टिकत नाही. अशा गोष्टी घडू नये, तसेच घडत असल्या तर त्या थांबवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये शुक्रवारी करण्याचे काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
देवी लक्ष्मीची पूजा – वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार लक्ष्मी माता ही धनाची देवता आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. जसं की रविवार हा सूर्य देवतेला समर्पित आहे. सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. त्याच प्रमाणे शुक्रवार हा वार माता लक्ष्मीला समर्पित आहे. दर शुक्रवारी तुमच्या घराच्या जवळ कुठेही लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करा, लक्ष्मी मातेला लाल फूलं अर्पण करा, यामुळे तुमच्या पाठीमागची सर्व संकट दूर होण्यास मदत होईल.
घरात लक्ष्मीचा फोटो – जर तुम्हाला पैशांची संबंधित अडचणी येत असतील, तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर अशावेळी तुमच्या देवघरामध्ये एक लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा त्याची मनभावे पूजा करायची. यामुळे लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने तुमची गरीबी तर दूर होईलच, मात्र लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाल्यास तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल, घरात सुख, शांती आणि समुद्धी येईस, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
उत्तर दिशेला कुबेराचा फोटो – जर तुमच्या घरात धन टिकत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात आणखी एक प्रभावी उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लाववा, यामुळे पैसा खर्च होण्याचं प्रमाण कमी होतं, धनाची बचत होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)