Vastu Shastra : घरात काच तुटणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार आपल्यासोबत काही विशिष्ट घटना घडतात. अशा घटना जर वारंवार घडत असतील तर त्यातून विशिष्ट संकेत मिळतो, हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. जर तुमच्या घरात वारंवार काच फुटण्याच्या घटना घडत असतील तर त्याचा अर्थ काय होतो? हे आपण आज जणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात वारंवार काच फुटण्याच्या घटना घडत असतील तर त्याला एक सामान्य गोष्ट म्हणून कधीही दुर्लक्ष करू नये. असं देखी मानलं जातं की तुमच्या घरावर एखादं मोठं संकट येणार असेल तर त्या संकटाचा प्रभाव काच आपल्यावर घेते, त्यामुळे देखील अनेकदा घरात काच फुटण्याच्या घटना घडत असतात. जर तुमच्या घरात अचानक काच फुटण्याची घटना घडली तर असं मानलं जातं, की तुमच्या घरावर येणारं मोठं संकट टळलं आहे. परंतु जर वारंवार काच फुटण्याचे प्रकार घडत असतील तर ते मात्र अशुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात वारंवार काच फुटण्याचे प्रकार घडत असतील तर त्यातून त्या व्यक्तीला घरावर येणाऱ्या संभाव्य संकटांचा इशारा मिळत असतो, अशा स्थितीमध्ये अधिक सतर्क होण्याची गरज असते.
नकारात्मक ऊर्जा – जर तुमच्या घरात वारंवार काच तुटण्याची घटना घडत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आहे, असा देखील होतो. घरात असलेलं काचेचं सामान वारंवार तुटणं याचाच अर्थ तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला आहे, असा होतो. त्यामुळे अशा स्थितीत घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. अशा स्थितीमध्ये घराची स्वच्छता ठेवणं, तसेच तुमच्या देव घरातील देवी देवतांची प्रार्थना असे उपाय तुम्ही करू शकतात. तसेच तुटलेली वस्तू जास्त दिवस घरात ठेवणं देखील अशुभ मानलं जातं.
भांडणं – जर तुमच्या घरात वारंवार काच फुटण्याच्या घटना घडत असतील तर त्याचा एक अर्थ असा देखील होतो की तुमच्या घरात अशांतता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होऊन, भांडणं होऊ शकतात. घरातील सुख शांती नष्ट होते, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच एखादं मोठं संकट येणार असेल तरी देखील अनेकदा घरात काच तुटण्याच्या घटना घडतात.
आर्थिक संकट – जर तुमच्या घरावर अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येणार असेल तरी देखील अशा घटना घरात घडू शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)