Vastu Shastra : अक्षय तृतीयेला देवघरात ठेवा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार जे साडेतीन शुभ मुहूर्त आहेत, त्यातील एक मुहूर्त हे अक्षय तृतीयेचं असतं. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात धन वृद्धीसाठी करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊयात.

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे साडेतीन शुभ मुहूर्त सांगण्यात आले आहेत, त्यातील एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हे आहे. यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकजण सोनं खरेदी करतात. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर वर्षभर पैसा घरात येत राहतो, आर्थिक समस्या निर्माण होत नाहीत, असं मानलं जातं. तसेच अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे यादिवशी अनेक जण नव नवीन वस्तू खरेदी करतात. कोणी वाहन खरेदी करतं. कोणी या दिवशी नव्या घरात प्रवेश करतं. तर अनेक जण या दिवशी आपल्या नव्या व्यवसायाला देखील प्रारंभ करतात. कारण अक्षय तृतीया हे शुभ मुहूर्त असून, या दिवशी कोणतंही काम सुरू केलं तर त्यात यश प्राप्त होतं अशी मान्यता आहे. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्हाला आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही.
गोमती चक्र – जर तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर एका लाल कपड्यामध्ये 11 गोमती चक्र बांधून ते माता लक्ष्मीच्या चरणी ठेवा. यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होतील, तसेच जर तुमच्यावर कर्ज असेल आणि ते खूप प्रयत्न करून देखील फिटत नसेल तर हळुहळु तुमची या कर्जामधून देखील मुक्ततात होईल. घराला आर्थिक स्थैर्य लाभेल.
एकाक्षी नारळ – जर तुमचे पैशांसंबंधी काही काम अडले असतील, कामांना अपेक्षित गती मिळत नसेल. उधारी अडकली असेल तर अशावेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघरामध्ये एक एकाक्षी नारळ ठेवा, यामुळे तुमची सर्व कामे मार्गी लागतील.
कमळ गट्ट्याची माळ – लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या चरणाशी कमळ गट्ट्याची माळ ठेवा, यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. घरामध्ये धनाची आवक वाढते.
चांदीचे नाणे – असं चांदीचं नाणं ज्यावर माता लक्ष्मी आणि श्री गणेशाचा फोटो असेल. हे नाणं तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरात स्थापित करून दररोज त्याची पूजा करू शकता, यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न मार्गी लागतात.
हळकुंड – हळकुंडाच्या पिवळ्या कापडात पाच गाठी करा आणि त्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, यामुळे तुमची तिजोरी पैशांनी भरलेली राहील. घराला आर्थिक स्थैर्य लाभेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)