Vastu Shastra : हातात पैसा टिकतच नाही? मग करा हे 5 सोपे उपाय

अनेकांसोबत असं होतं की ते खूप कष्ट करतात, प्रचंड पैसा कमावतात पण त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. यावर वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : हातात पैसा टिकतच नाही? मग करा हे 5 सोपे उपाय
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 11:26 PM

अनेकांसोबत असं घडतं की ते प्रचंड पैसा कमावतात, पण त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. जेवढा पैसा कमावतात तेवढा तो खर्च होतो. जर एखादा नोकरदार व्यक्ती असेल तर तो महिन्याच्या सुरुवातीला हातात पगार आला की, निश्चित करतो की या महिन्यात आपण थोडी तरी बचत ही करायचीच परंतु  महिन्याच्या शेवटी स्थिती अशी असते की त्याच्या बँक खात्यात पैसेच नसतात. थोडक्यात काय तर पैशांची बचत होत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होतो. अनावश्यक खर्च कमी व्हावा, पैशांची बचत व्हावी, आपल्या घराची तिजोरी धनानं सदैव भरलेली राहावी यासाठी वस्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत,

पाकिटात एक विलायची ठेवा – जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, तुम्हाला कायम पैशांची चणचण भासत असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुमच्या पाकिटामध्ये नेहमी विलायचीचे दोन ते तीन दाणे ठेवा. हे दाणे दर महिन्यांनी बदला. या उपायामुळे नकारात्मक शक्ती कमी होते, आणि तुमच्याकडे येणारी पैशांची आवक वाढते.

घराचा उंबरा – जर तुमच्याजवळ पैसा टिकत नसेल तर दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने तुमच्या घराचा मुख्य उंबरा पुसून घ्या, त्या पाण्यात थोडंस मीठ टाका. यामुळे सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर राहते आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो.

देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो – तुमच्या देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा, त्याची दररोज पूजा करा. भक्तीभावाने प्रार्थन करा, यामुळे तुमच्यावर सदैव लक्ष्मीमातेचा आशीर्वाद राहतो, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात.

कुबेराचा फोटो – तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावा, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते, यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात.

घराची स्वच्छता- घर नेहमी स्वच्छ ठेवा, ज्या घरात स्वच्छता असते, त्या घराला बरकत प्राप्त होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us