Vastu Shastra : रस्त्यात सापडलेल्या या वस्तू चुकूनही घरी आणू नका, आयुष्यात अडचणी वाढतील

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं, त्याची रचना कशी असावी? याबद्दल तर उपाय सांगीतलेच आहेत. परंतु अनेकदा काय होतं की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन, नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यावर देखील उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : रस्त्यात सापडलेल्या या वस्तू चुकूनही घरी आणू नका, आयुष्यात अडचणी वाढतील
VASTUSHTRA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 7:35 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं, त्याची रचना कशी असावी? याबद्दल तर उपाय सांगीतलेच आहेत. परंतु अनेकदा काय होतं की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन, नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी काय उपाय करावेत? घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीसाठी काय करावं? याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्या आपल्याला अनेकदा रस्त्यावरून जात असताना रस्त्यात पडलेल्या आढळून येतात. परंतु कधीही या वस्तू उचलून घरी आणण्याची चूक करू नये. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्याचा परिणाम हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. यामुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी येण्याची शक्यता निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशा नेमक्या कोणत्या वस्तू आहेत? त्याबद्दल.

या वस्तू घरात का आणू नये?

Loading...

वास्तुशास्त्रानुसार रस्त्यावर विविध प्रकारच्या ऊर्जांचे प्रवाह वाहत असतात. यामध्ये सकारात्मक शक्ती असू शकते. नकारात्मक शक्ती देखील असू शकते. या सर्व गोष्टींचा परिणाम अशा वस्तूंवर झालेला असतो. तसेच काही वस्तू या विशिष्ट पूजा विधीशी संबंधी देखील असू शकतात. त्यामुळे आपल्या घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात, पैशांची चणचण जाणवणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या वस्तू या घरात आणू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

पूजा विधीशी संबंधित साहित्य – वास्तुशास्त्रानुसार रस्त्यावर तुम्हाला कुठेही पूजा विधीशी संबंधित साहित्य जसं की फुलं, हार, नारळ या सारख्या वस्तू दिसून आल्या तर कधीही या वस्तूंना हात लावण्याची चूक करू नका, तसेच अशा वस्तूंना कधीही घरात आणू नका कारण यामुळे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वाढू शकते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

तुटलेले दागिने, लोखंडाच्या वस्तू – वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तू किंवा एखादी लोखंडाची वस्तू तुम्हाला रस्त्यात सापडली तर तिला देखील कधीही घरी आणलं नाही पाहिजे, कारण यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us