Vastu Shastra : तुम्ही देखील या पाच चुका करतायेत का? तर मनी प्लांटमुळे होईल तुमचं मोठं नुकसान
वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटला अतिशय शुभ माण्यात आलं आहे. ज्या घरात मनी प्लांट आहे, त्या घरातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात असं मानलं जातं. मात्र जर मनी प्लांटशी संबंधित काही चुका झाल्या तर मात्र त्याचा उलटा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो.

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना खूपच शुभ माण्यात आलं आहे, ही झाडं जर तुम्ही घरात लावली तर तुमच्या घरात असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते त्यामुळे ऊर्जा संतुलन साधलं जातं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये घरात जी झाडं लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यातीलच एक झाडं म्हणजे मीन प्लांट, मनी प्लांटला वास्तुशास्त्र तसेच फेंगशुईमध्ये देखील अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. जर तुमच्या घरात वारंवार आर्थिक अडचणी निर्माण होत असतील किंवा तुम्ही खूप कष्ट करता प्रचंड पैसा कमवता मात्र पैसा जर हातात टिकत नसेल तर अशावेळी घरामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी मनी प्लांटचा वेल लावण्याचा सल्ला दिला जातो. मनी प्लांटमुळे वास्तुदोष दूर होऊन आर्थिक स्थिरता प्राप्त होते असं मानलं जातं. मात्र मनी प्लांट लावताना देखील काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा त्याचा उलट परिणाम पहायला मिळतो. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात.
ईशान्य दिशेला मनी प्लांट ठेवणं – ईशान्य दिशा ही देवतांची दिशा असते, त्यामुळे चुकूनही या दिशेला मनी प्लांट ठेवू नये, ते अशुभ मानलं जातं. यामुळे घरात येणारी पैशांची आवक कमी होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
जमिनीवर मनी प्लांट पसरू देणे – मनी प्लांटच्या वेलाला कधीही जमिनीवर पसरू देऊ नका, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या येऊ शकतात, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात.
पिवळे पानं काढून न टाकणं- मनी प्लांटची पानं वाळली की ती पिवळी पडतात, मात्र अशी पानं वेळच्या वेळी काढली गेली पाहिजेत.
प्लास्टिकच्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावणं – मनी प्लांट हा कधीही प्लास्टिकच्या कुंडीमध्ये लावू नये, मनी प्लांट प्लास्टिकच्या कुंडीमध्ये लावणं अशुभ मानलं जातं.
तसेच मनी प्लांट जर खूप वाढला असेल आणि इतरांनी जर तो तुमच्याकडे घरी लावण्यासाठी मागितला तर अशा पद्धतीने देणं देखील वास्तुशास्त्रात अशुभ माण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)