Vastu Shastra : अशी स्वप्न असतात खूपच शुभ, नशीबच बदलत, वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?

अनेकदा आपल्याला झोपेमध्ये असे काही स्वप्न पडतात, जे आपल्यासाठी पूर्णपणे नवे असतात. आपण दुसर्‍या दिवशी दिवसभर त्या स्वप्नाचा विचार करत बसतो, अनेकजण तर अशा स्वप्नाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न देखील करतात. वास्तुशास्त्रानुसार काही स्वप्न ही खूप शुभ असतात, ती नेहमी माणसाला चांगलं फळ देतात.

Vastu Shastra : अशी स्वप्न असतात खूपच शुभ, नशीबच बदलत, वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
Vastu Shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 6:55 PM

तुम्ही कधी विचार केला आहे का? की तुम्ही झोपेत असताना तुम्हाला स्वप्न का पडतं? तर त्यामागे एक सामान्य गोष्ट असते, ती म्हणजे तुम्ही दिवसभ एखाद्या गोष्टीचा विचार करत असतात. किंवा एखादी गोष्ट ही अशीच घडावी अशी तुमची मनातून इच्छा असते. अशावेळी तुम्ही दिवसभर ज्या गोष्टींचा विचार करता किंवा तुमच्या मनात जी इच्छा असते, त्या गोष्टींची स्वप्न तुम्हाला रात्री पडू शकतात. अनेकांच्या बाबतीमध्ये तर असंच घडतं. परंतु असे देखील काही स्वप्न असतात, ते तुमच्यासोबत भविष्यात घडणाऱ्या एखाद्या घटनेचे संकेत देखील देतात. त्यामुळे आपल्याला हे संकेत वेळीच ओळखता आले पाहिजेत. काही विशिष्ट स्वप्न जर आपल्याला वांरवार पडत असतील तर त्यामागचे संकेत आपण लक्षात घेतले पाहिजेत. आज आपण चांगले संकेत देण्याऱ्या काही स्वप्नांबाबत जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशी स्वप्न जर तुम्हाला पडत असतील तर तो एक तुमच्यासाठी शुभ संकेत ठरू शकतो. भविष्यात तुमची भरभराट होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.

स्वप्नात देवी -देवता येणं – अनेकांच्या स्वप्नात देवी-देवता येतात. काहींच्या स्वप्नात देवी देवतांच्या प्रतिमा येतात. हे एक अतिशय शुभ स्वप्न मानलं जातं. वा्स्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा प्रकारे वांरवार देवी-देवता येत असतील तर त्याचे दोन संकेत असू शकतात. एक म्हणजे तुमच्या हातून एखादं फार मोठं कार्य होणार आहे, आणि दुसरा संकेत म्हणजे आता लवकरच तुमचं आयुष्य बदलणार आहे, तुमच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Loading...

स्वप्नात हत्ती दिसणं – जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात हत्ती दिसला तर ते स्वप्न अतिशय शुभ मानलं जातं. कारण हत्तीला धन, संपत्ती आणि स्थिरता याचं प्रतिक मानलं जातं. ज्या व्यक्तीला स्वप्नात हत्ती दिसतो, त्या व्यक्तीचं आयुष्य आता लवकरच बदलणार आहे, अशा व्यक्तीच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.

स्वप्नात मौल्यवान वस्तू दिसणं – जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नात एखादी मौल्यवान वस्तू दिसली तरी देखील ते स्वप्न अतिशय शुभ माण्यात येतं. याचाच अर्थ आता लवकरच तुमचं आयुष्य बदलणार आहे, हातात मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us