Vastu Shastra : पैशांची 3 झाडं, घरात लावल्यास होईल धनाचा वर्षाव, कर्जातून मिळते झटपट मुक्ती

वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगण्यात आली आहेत, ती घरात लावणं अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. ही झाडं जर तुम्ही घरात लावली तर तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात, तसेच अनावश्यक खर्च कमी होऊन पैशांची बचत होते. याच झाडांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : पैशांची 3 झाडं, घरात लावल्यास होईल धनाचा वर्षाव, कर्जातून मिळते झटपट मुक्ती
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 20, 2026 | 7:25 PM

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना हे अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. तर काही झाडांना अशुभ देखील माण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या घरात कोणतं झाड लावतात? त्यानुसार तुमच्या घराच्या वातावरणात बदल होतो. काही झाडं ही अशी असतात की जी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जसं की काहीही कारण नसताना वारंवार घरात भांडणं होतात, आर्थिक समस्या निर्माण होतात. एवढंच नाही तर त्याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होत, त्यामुळे अशी झाडं घरात लावू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तर कही झाडं अशी देखील असतात जी तुम्ही घरात लावली तर त्याचं अत्यंत शुभ फळ तुम्हाला मिळतं. या झाडांमुळे घरातील ऊर्जा संतुलन साधलं जातं. तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, आज आपण अशाच तीन झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. या झाडांना पैसा देणारी झाडं असं देखील म्हटलं जातं.

तुळशीचं झाड – हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. तुळस हे झाड भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात तुळस असते, तुळशीची रोज पूजा केली जाते, सायंकाळी तुळशीजवळ दिला लावला जातो, अशा घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे तुमच्यावर येणारी सर्व प्रकारची आर्थिक संकट आपोआप नष्ट होतात, आणि तुमची तिजोरी पैशांनी भरून जाते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

मनी प्लांट – वास्तुशास्त्र तसेच फेगंशुईमध्ये देखील मनी प्लांटला अतिशय शुभ माण्यात आलं आहे. मनी प्लांटला पैसे देणारं झाडं असं देखील म्हटलं जातं. ज्या घरात मनी प्लांट आहे, त्या घरात आर्थिक बरकत येते, असं मानलं जातं. मात्र मनी प्लांट लावताना काही चुका या टाळल्या पाहिजेत, जसं की मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये, ही देवाची दिशा असते, जर तुम्ही मनी प्लांट हा ईशान्य दिशेला लावला तर तुम्हाला आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. मनी प्लांट हा घराच्या नेहमी पूर्व दिशेला लावावा, यामुळे घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असं मानलं जातं.

शमी – शमी वृक्षाला वास्तुशास्त्रात अत्यंत पवित्र आणि शुभ झाडं मानलं जातं. ज्या घरात शमीचं झाडं असतं, त्या घराचं आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us