Vastu Shastra : एकादशीच्या दिवशी काय करावं अन् काय करू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला अत्यंत पवित्र मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंचं नामस्मरण तसेच उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो, अशी मान्यता आहे. परंतु एकादशीच्या दिवशी काय करावं? आणि कय करू नये? याचे देखील काही विशिष्ट नियम आहेत. त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

एकादशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसेच वारकरी संप्रदायामध्ये देखील एकादशीला विशेष महत्त्व आहे. लाखो वारकरी एकादशीच्या दिवशी उपवास करतात. महिन्यातून दोन एकादशी येतात. या दिवशी उपवास केल्यास तसेच भगवान विष्णू यांची आराधना केल्यास आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळेच एकादशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. एकादशीच्या दिवशी दान धर्म देखील केला पाहिजे, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण एकादशीच्या दिवशी काय करावं? आणि काय करू नये? याबद्दल वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
भगवान विष्णूची उपासना – हिंदू धर्मशास्त्रामध्ये एकादशी ही तिथी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी तुमच्या घराच्या आसपास कुठे जर विष्णूंचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जावं, भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करावी, तसेच या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं भगवान विष्णूंचं नामस्मरण करावं, यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, घरातील सर्व प्रकारच्या अडी-अचणी दूर होतात. घराला सुख, शांती, स्थैर्य लाभतं घराला बरकत प्राप्त होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
तुळशीजवळ दिवा लावा – तुळशीजवळ दिवा तर दररोज लावला पाहिजे, परंतु जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर कमीत -कमी एकादशीच्या दिवशी तरी तुळशीजवळ दिवा लावावा, यामुळे घराला बरकत प्राप्त होते. घर अन्नधान्यांनी भरलेलं राहतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
देवाची पूजा – इतर वेळी जरी तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा केली नाही तरी चालेल, परंतु एकादशीच्या दिवशी देवाची पूजा आवश्य करावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
एकादशीच्या दिवशी काय करू नये – एकादशीच्या दिवशी कधीही पूजेसाठी तुळशीच्या मंजुळा तोडू नये, हवं तर त्या आधीच तोडून ठेवाव्यात परंतु एकादशीच्या दिवशी मंजुळा तोडू नयेत, तसेच या दिवशी कठोर शब्द टाळावेत, कोणाचे मन आपल्यामुळे दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच या दिवशी जर तुमच्या घरी कोणी पाहुणा आलाच तर त्याला कधीही जेवल्याशिवाय परत पाठवू नये, कारण अन्नदान हेच श्रेष्ठ दान असं हिंदू धर्म ग्रंथामध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)