पर्समध्ये पैसा टिकत नाही? वास्तुशास्त्रानुसार या रंगाची निवड ठरू शकते शुभ !

वास्तुशास्त्रानुसार, पर्सच्या रंगाचाही आर्थिक स्थिती आणि पैशांच्या बरकतीशी संबंध असल्याचं मानलं जातं. त्यामुळे पर्स खरेदी करताना कोणत्या रंगाची निवड करणं शुभ मानलं जातं, जाणून घ्या.

पर्समध्ये पैसा टिकत नाही? वास्तुशास्त्रानुसार या रंगाची निवड ठरू शकते शुभ !
| Edited By: | Updated on: Oct 15, 2026 | 10:00 PM

आपल्या पर्समध्ये पैसे टिकावेत, विनाकारण खर्च होऊ नये आणि आर्थिक स्थिती सुधारावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेक जण बचत, गुंतवणूक आणि खर्चाचं योग्य नियोजन करण्यावर भर देतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार पर्सच्या रंगालाही विशेष महत्त्व दिलं जातं. काही रंग धन, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानले जातात, तर काही रंग विशिष्ट उद्दिष्टांसाठी शुभ समजले जातात. त्यामुळे नवीन पर्स खरेदी करताना केवळ तिचं डिझाइन किंवा किंमत न पाहता रंगाची निवडही विचारपूर्वक करावी. जाणून घेऊया, कोणत्या रंगाची पर्स शुभ मानली जाते.

हिरवा रंग

Loading...

वास्तुशास्त्रात हिरवा रंग प्रगती, नवी सुरुवात आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. आर्थिक प्रगतीची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी हिरव्या रंगाची पर्स शुभ मानली जाते. नोकरीत नवीन संधी शोधणारे किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करणारे लोक या रंगाची निवड करू शकतात.

लाल रंग

लाल रंग ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार, हा रंग आर्थिक व्यवहारांमध्ये सक्रियता आणि काम करण्याची प्रेरणा दर्शवतो. विशेषतः व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती लाल रंगाच्या पर्सला पसंती देऊ शकतात.

पिवळा रंग

पिवळा रंग आनंद, सकारात्मकता आणि समृद्धीशी जोडला जातो. वास्तुशास्त्रानुसार, हा रंग आर्थिक भरभराटीचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे धन संपत्ती आणि प्रगतीची इच्छा असणाऱ्या व्यक्ती पिवळ्या रंगाची पर्स निवडू शकतात. या रंगामुळे सकारात्मक विचारांना चालना मिळते.

गोल्डन रंग

सोनेरी रंगाचा संबंध वैभव, ऐश्वर्य आणि संपन्नतेशी जोडला जातो. त्यामुळे आकर्षक आणि पारंपरिक लूक आवडणाऱ्या व्यक्तींसाठी गोल्डन पर्स एक चांगला पर्याय ठरू शकते. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, हा रंग धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा एखाद्या खास प्रसंगी सोनेरी रंगाच्या पर्सला पसंती दिली जाते.

काळा रंग

काळ्या रंगाची पर्स बहुतांश लोक वापरतात. वास्तुशास्त्रातील काही मान्यतांनुसार, काळा रंग स्थैर्य आणि सुरक्षिततेशी संबंधित मानला जातो. आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त राखणं आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं यांचं महत्त्वही या संदर्भात सांगितलं जाते.

ब्राऊन रंग

ब्राऊन रंग स्थिरता, संतुलन आणि विश्वासार्हतेचं प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार, आर्थिक स्थैर्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी हा रंग योग्य मानला जातो. साधेपणा आणि टिकाऊपणाला महत्त्व देणाऱ्या व्यक्तींनाही तपकिरी रंगाची पर्स आवडू शकते.

पर्स वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी

वास्तुशास्त्रानुसार, पर्स नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावी. त्यामध्ये जुन्या पावत्या, निरुपयोगी कागदपत्रं आणि अनावश्यक वस्तू साठवून ठेवू नयेत. फाटलेल्या नोटा किंवा खराब झालेली पर्स वापरणं टाळावं.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us