घरात पैशांची चणचण असेल तर किचनकडे लक्ष द्या, जाणून घ्या वास्तुच्या ‘या’ टिप्स
घरातील किचनचा आर्थिक स्थितीशीही संबंध असल्याचे वास्तुशास्त्रात मानले जाते. स्वयंपाकघराची दिशा आणि काही वस्तूंची मांडणी योग्य ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते, अशी मान्यता आहे. जाणून घेऊया किचनशी संबंधित काही खास वास्तु टिप्स.

घरातील किचन हे केवळ स्वयंपाक करण्याचे ठिकाण नसून वास्तुशास्त्रात त्याला विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुनुसार स्वयंपाकघराची दिशा, फरशीचा उतार, स्लॅबची रचना आणि वस्तूंची मांडणी यांचा घरातील सकारात्मक ऊर्जेशी संबंध असतो. त्यामुळे घरात वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, तर किचनशी संबंधित काही वास्तु टिप्स लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. किचन योग्य दिशेला असणे जितके महत्त्वाचे मानले जाते, तितकेच तेथील वस्तू योग्य ठिकाणी ठेवणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. याशिवाय ज्योतिषीय मान्यतेनुसार काही साधे उपाय केल्याने बुध आणि शनीशी संबंधित ऊर्जा संतुलित होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया की आर्थिक चणचण दूर करण्यासाठी किचनशी संबंधित कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे.
किचनच्या फरशीचा उतार तपासा
वास्तुनुसार किचन शक्यतो अग्निकोणात म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशेला असावे, अशी मान्यता आहे. मात्र किचनच्या फरशीचा उतार चुकीच्या दिशेला असल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. विशेषतः किचनची फरशी इतर भागांपेक्षा खाली असणे किंवा तिचा उतार दक्षिणेकडे असणे टाळावे. अशी रचना असल्यास फरशीचा स्तर योग्य करून घेण्याचा सल्ला दिला जातो.
किचनच्या स्लॅब आणि कपाटांची योग्य मांडणी
किचन योग्य दिशेला असले तरी स्लॅब आणि कपाटांची मांडणीही महत्त्वाची मानली जाते. वास्तुनुसार भांडी ठेवण्यासाठीची कपाटे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावीत. तसेच किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी उत्तर-पश्चिम दिशा योग्य मानली जाते. किचनमध्ये हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या खिडक्या असाव्यात, असेही सांगितले आहे.
पक्ष्यांना द्या हिरवे मूग
ज्योतिषीय मान्यतेनुसार हिरवे मूग बुध ग्रहाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे दररोज पक्ष्यांना अक्खे हिरवे मूग खाऊ घालण्याचा उपाय सुचवला आहे. या उपायामुळे बुध ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत मिळते, अशी मान्यता आहे.
किचनच्या पश्चिम दिशेला काळे तीळ ठेवा
किचनच्या पश्चिम दिशेला स्टीलच्या डब्यात काळे तीळ ठेवण्याचाही उपाय सांगितला जातो. ज्योतिषीय मान्यतेनुसार पश्चिम दिशा शनिशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या दिशेला काळे तीळ ठेवल्याने शनीशी संबंधित नकारात्मक ऊर्जा संतुलित होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.