Vastushastra : फ्रिजवर ठेवा या चार वस्तू; बँक बॅलन्स होईल डबल, आर्थिक समस्यांपासूनही होईल सुटका

तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू ही तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असते. वास्तुशास्त्रामध्ये फ्रिजला देखील ऊर्जेचं केंद्र माण्यात आलं आहे. काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू या जर तुम्ही फ्रिजवर ठेवल्या तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि तुमच्या घरातील वस्तुदोष दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Vastushastra : फ्रिजवर ठेवा या चार वस्तू; बँक बॅलन्स होईल डबल, आर्थिक समस्यांपासूनही होईल सुटका
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 8:52 PM

तुमच्या सभोवती ज्या काही वस्तू असतात त्या वस्तुंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच वास्तुशास्त्रामध्ये दिशेला देखील महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणती वस्तू कुठे ठेवावी? याच्या दिशा देखील आधीच ठरलेल्या असतात. जर तुम्ही एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवली तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रिज असतंच, फ्रिज ही आजच्या काळामध्ये एक गरजेची वस्तू बनली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात असलेलं फ्रिज हे केवळ एक मशिनच नाही तर ते तुमच्या घरातील एक ऊर्जेचं केंद्र असतं. तुम्ही फ्रिजवर कोणत्या वस्तू ठेवतात? त्यावरून ही ऊर्जा प्रभावीत होते. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी फ्रिजवर ठेवल्या तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तर योग्य गोष्टी ठेवल्या तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात फ्रिजवर कोणत्या गोष्टी ठेवाव्यात? आणि कोणत्या गोष्टी ठेवू नयेत? याबद्दल.

फ्रिजवर या वस्तू ठेवाव्यात – वास्तुशास्त्रानुसार फ्रिज हे तुमच्या घरातील ऊर्जेचं एक महत्त्वाचं केंद्र असतं. त्यामुळे तुम्ही घरात सकारात्मक ऊर्जा टिकून रहावी, यासाठी फ्रिजवर मनी प्लांटचं छोटसं रोप ठेवू शकता, यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील. यासोबतच तुम्ही फ्रिजवर लाफिंग बुद्धा, हत्ती या सारख्या मूर्ती ठेवू शकता. तसेच तुम्ही फ्रिजच्या दरवाजाला हॅपी इमोजी देखील लावू शकतात. यामुळे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहण्यास मदत होईल.

या वस्तू फ्रिजवर ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार फ्रिजवर चुकूनही औषधं ठेवू नये. फ्रिजवर औषधी न ठेवण्याचे दोन मुख्य कराणं आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. तसेच फ्रिज जरी आतून थंड असलं तरी देखील बाहेरून उष्णता उत्सर्जित होत असते, त्याचा परिणाम हा औषधांवर होऊन ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे फ्रिजवर कधीही औषधं ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर फ्रिजवर चुकूनही चावी, तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us