Dream: वारंवार येतायेत ही 5 स्वप्न? तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची नांदी?

Dream Signs: वारंवार तीच काही स्वप्न तुम्हाला पडत असतील तर त्यामागे विश्व तुम्हाला काही तरी सुचवू इच्छित आहे. अवचेतन मनाकडून येणारे हे संकेत काय आहेत?

Dream: वारंवार येतायेत ही 5 स्वप्न? तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची नांदी?
वारंवार येतायेत ही 5 स्वप्न? तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची नांदी?
| Updated on: Nov 28, 2026 | 2:21 PM

Dream Signs: गाढ झोपेत अनेकदा आपल्याला स्वप्न पडतात. सकाळी सकाळी स्वप्न पडतात, ते वास्तवात घडतं, असे मानलं जाते. आपल्या मनातील भावना, दैनंदिन तणाव आणि भविष्यातील संभाव्या घडामोडींशी स्वप्नांचा संबंध जोडलेला असतो. काही स्वप्न वारंवार पडत असतील, तर त्यामागाचा अर्थ समजून घ्यावा याची उत्सुकता असतेच. अशीच स्वप्न वारंवार का पडतात याच्याविषयी कुतुहल असते. काही विशिष्ट प्रकारची स्वप्न विश्वाकडून आपल्या अवचेतन मनाकडून वारंवार मिळणारे संकेत मानली जातात.

वारंवार येणार्‍या पाच स्वप्नाचे संकेत

Loading...

१. उंचावरून पडण्याचे स्वप्नः हे स्वप्न अनेकदा पडते. आयुष्यातील असुरक्षितता, ताणतणाव, मानसिक थकवा अथवा एखादी व्यक्ती, एखाद्या गोष्टीवरील आपली भावनिक नाळ सैल झाल्याची भावना प्रबळ झाली अथवा आयुष्यात मोठ्या बदलासाठी मन पुरेसे तयार नसेल. मनात धाकधूक असेल तर अशी स्वप्न पडण्याची शक्यता असते.

२. हवेत उडण्याचे स्वप्नः स्वप्नात तुम्ही उडत असाल तर मग तुमचा स्वतंत्रपणे जगण्याचा काळ सुरू होण्याचे हे संकेत मानले जातात. स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि मर्यादा तोडत पुढे जाण्याची इच्छा या स्वप्नातून दिसून येते. बंधनातून मुक्तीचा हा संकेत मानला जातो.

३. दात पडण्याचे स्वप्नः काही लोकमान्यतेनुसार दात पडण्याचे स्वप्न चिंतेशी संबंधित आहे. जवळच्या नात्यातील व्यक्तीचे बदलते स्वरुप, नाते संबंधातील ताण तणाव, चढउतार, नाते तुटण्याची भीती, आत्मविश्वास कमी होण्याचे संकेत यातून मिळतात.

४. कोणीतरी पाठलाग करण्यात असल्याचे स्वप्नः हे स्वप्न दैनंदिन आयुष्यातील एखाद्या जबाबदारीपासून, तणावापासून अथवा कठीण परिस्थितीतून पळ काढण्याच्या वृत्तीचे प्रतिक मानण्यात येते. अथवा एखाद्या परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते, याचे हे संकेत आहे.

५. अचानक गाळात फसण्याचे स्वप्नः अचानक गाळात, तलावात, धरणात फसल्याचे स्वप्न पडल्यास एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची अद्याप तयारी झाली नसल्याचे हे संकेत आहेत.

डिस्क्लेमरः विविध स्त्रोतावरून घेतलेली ही माहिती आहे. हा कोणताही दावा नाही. टीव्ही 9 मराठी कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us