
सनातन धर्मात, दररोज मंदिरात जाणे आणि देवाचे दर्शन घेणे याला विशेष महत्त्व आहे. अनेक लोकांचा दररोज मंदिरात जाण्याचा दिनक्रम असतो. ही मंडळी रोज मंदिरात जातात. काहीजण मंदिरात जाऊन नामजपही करतात. तर काहीजण शांत ध्यान करत बसतात. असं केल्यानं त्यांना शांती मिळते. मनातले विचार शांत होतात. अनेकदा आपण हे पाहिलं असेल की काही लोक देवाचं दर्शन घेऊन झालं की मंदिराच्या आवरात काहीवेळ बसतात तर काहीजण मंदिराच्या पायऱ्यांवर बसतात.
मंदिराच्या पायऱ्यांवर बसण्यामागे रहस्य लपलेलं आहे
देवाचे दर्शन झाल्या-झाल्या लगेच घऱी निघू नये काही सेकंद का असेना पण मंदिरात बसून मग निघावं असं म्हटलं जातं. त्यामागे एक मोठं कारण आहे. जे कदाचितच सर्वांना माहित असेल. चला जाणून घेऊयात. मंदिरात देवाचे दर्शन घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर बसणे देखील महत्त्वाचे आहे. कदाचित तुमच्यापैकी अनेकांना याबद्दल माहिती नसेल, परंतु शास्त्रांमध्ये त्याचे वर्णन केले आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर काही काळ बसणे का आवश्यक आहे हे जाणून घेऊयात.
मंदिराच्या पायऱ्यांवर बसणे शुभ मानले जाते
वडिलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मंदिरात प्रार्थना केल्यानंतर काही वेळ मंदिराच्या पायऱ्यांवर बसणे गरजेचे असते.यामागे एक मोठे रहस्य लपलेले आहे. जर आपण धार्मिक श्रद्धेवर विश्वास ठेवला तर मंदिराच्या शिखराला देवतेचे मुख आणि मंदिराच्या पायऱ्यांना त्यांची चरण पादुका म्हणतात. अशा परिस्थितीत, देवाचे दर्शन घेतल्यानंतर, मंदिराच्या पायऱ्यांवर काही वेळ बसून आपल्या इष्ट देवते स्मरण केल्याने इच्छा लवकर पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तसेच पायऱ्यांवर बसून देवासमोर केलेला जप ही आयुष्यात सकारात्मक बदल आणतो असं म्हटलं जातं.
मंदिराच्या पायऱ्यांवर मंत्रजाप किंवा नामस्मरण करावं
जेव्हा तुम्ही मंदिराच्या पायऱ्यांवर बसून देवाची प्रार्थना करता तेव्हा तुम्ही कोणताही एक मंत्रजाप केला पाहिजे किंवा देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. श्रद्धेनुसार, या मंत्रजाप किंवा नामस्मरण केल्याने मन शुद्ध होते आणि ते खूप शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्यातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते तसेच तुमची प्रार्थना लवकर पूर्ण होण्याचा विश्वास निर्माण होतो.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)