KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये राडा? शाहरुखने घेतली सीईओसह प्लेयर्सची शाळा? Viral Videoने चर्चांना उधाण
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये KKR टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये राडा झाल्याचे म्हटले जात आहे.

ईडन गार्डन्सवर पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान (किंग खान) स्वतः उपस्थित होता. मात्र, केवळ ३.४ ओव्हर्सचा (२२ चेंडू) खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करण्यात आला. या निराशाजनक स्थितीत शाहरुख खान KKRच्या ड्रेसिंग रुममध्ये नाराज दिसला. या ड्रेसिंग रुममधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन शाहरुखने केकेआरच्या खेळाडूंची शाळा घेतल्याचे म्हटले जात आहे.
नेमकं काय घडलं?
पाऊस सुरू असताना शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि खेळाडूंची भेट घेतली. यावेळी तो KKRचे सीईओ वेंकी मैसूर यांच्याशी जोरदार चर्चा करताना दिसला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत शाहरुख खान हातवारे करत काही तरी गंभीर बोलत असल्याचे स्पष्ट दिसते. टीमच्या कामगिरीवर तो नाराज असल्याचे चित्र सामोरे आले आहे.
खेळाडूंची शाळा घेतली का?
सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे की, शाहरुख खानने खेळाडूंची ‘शाळा’ घेतली का? आतापर्यंत KKRने IPL २०२६ मधील पहिले दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही सुरुवात खराब झाल्याने शाहरुख नाराज दिसत होते, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. काहींनी तर टोला लगावला की, “शाहरुख आल्यानंतरच KKRचे पॉइंट्स टेबलचे खाते उघडले!” तर काहींनी म्हटले, “शाहरुखचा पायगुण चांगला आहे.”
टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय फसला
तीन वेळा IPL चॅम्पियन असलेल्या KKRची यंदाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. ईडन गार्डन्सवर टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला, पण तो फसला. फिन अॅलन आणि कॅमेरून ग्रीन कमीमध्ये बाद झाले. स्कोअर २५/२ असताना पावसाने खेळ थांबवला. या सामन्यात KKRचा स्टार गोलंदाज हर्षित राणा (जो दुखापतीमुळे IPL २०२६ मधून बाहेर आहे) देखील उपस्थित होता. शाहरुख खानसोबत त्यानेही हजेरी लावली होती.
सध्या KKRला पहिला विजय मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसामुळे दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले. व्हायरल व्हिडिओ आणि शाहरुखच्या अभिव्यक्तीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. KKRची कामगिरी सुधारेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.