अरे… अरे… अरे… अडकला! मैदानावर धडाकेबाज खेळी मात्र साधी गोष्ट जमे ना; अभिषेक शर्माचा ‘तो’ Video तुफान व्हायरल

भारतीय क्रिकेटपटूंच्या क्रिकेट खेळीसह त्यांच्या जिवनातील काही गोष्टी आणि कृती सहज कॅमेऱ्यात कैद होतात. अशावेळी त्याचे काही मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होतात. अशात भारतातील धडाकेबाज खेळाडू अभिषेक शर्म हा विशेष चर्चेत आला आहे.

अरे... अरे... अरे... अडकला! मैदानावर धडाकेबाज खेळी मात्र साधी गोष्ट जमे ना; अभिषेक शर्माचा तो Video तुफान व्हायरल
abhishek sharma viral video
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 4:39 PM

भारतीय क्रिकेटपटूंच्या क्रिकेट खेळीसह त्यांच्या जीवनातील काही गोष्टी आणि कृती सहज कॅमेऱ्यात कैद होतात. अशावेळी त्याचे काही मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होतात. अशात भारतातील धडाकेबाज खेळाडू अभिषेक शर्मा हा विशेष चर्चेत आला आहे. अभिषेक शर्मा सध्या आपल्या आक्रमक फलंदाजीसोबतच सोशल मीडियावरील एका मजेशीर व्हिडीओमुळे नेटकऱ्याच्या नजरेस भराला आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये अभिषेक कारमध्ये चढताना दिसत आहे. यावेळी त्याचा टी-शर्ट कारच्या दरवाजाच्या हँडलमध्ये अडकतो. टी-शर्ट सोडवण्याचा प्रयत्न करताना त्याचा हातही काही क्षण अडकल्याचे दिसते. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून, त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडीओमध्ये अभिषेक कॅज्युअल कपड्यांमध्ये कारजवळ उभा असल्याचे दिसते. टी-शर्ट हँडलमध्ये अडकल्यानंतर तो तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यावर अनेकांनी हसत प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्टला काही तासांत 4.8K पेक्षा जास्त लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्याचे दिसते.

Loading...

कमेंट्समध्ये एका युजरने, “Oops” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या युजरने, “किती नाटकी आहेत हे” असे लिहिले आहे. तर आणखी एका युजरने,काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. एकाने तर थेट लिहिलं ‘बरं झालं तुझा टीशर्ट आणि हात अडकला आणि तु बाजूला राहिला.”

दरम्यान, अभिषेकची क्रिकेटमधील कामगिरीही चर्चेत आहे. 17 सप्टेंबर 2026 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध त्याने अवघ्या 34 चेंडूत 108 धावा केल्या. यामध्ये 9 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. याआधी 15 सप्टेंबरला त्याने 19 चेंडूत 39, तर 13 सप्टेंबरला 32 चेंडूत 82 धावा केल्या होत्या. 2026 IPL मध्येही त्याने 563 धावा केल्या आहेत.

2026 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्धच्या T20I मालिकेतही 59 आणि 43 धावांच्या खेळी केल्या. जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध गोलंदाजीत 3/17 अशी कामगिरीही त्याच्या नावावर आहे. आयसीसी रेकॉर्डनुसार तो भारताच्या T20I संघातील अष्टपैलू खेळाडू असून, त्याची फलंदाजीतील आक्रमक शैली सातत्याने चर्चेत राहिली आहे. abhishek sharma viral videoया व्हिडीओमुळे त्याच्या क्रिकेटबाहेरील मजेशीर क्षणाचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us