अर्जुन तेंडुलकर याचा मोठा खुलासा, मुंबई इंडियन्स सोडण्यावर माैन सोडले, थेट म्हणाला..
सचिन तेंडुलकर याचा लेक अर्जुन तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. अर्जुन याने मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. यावर आता स्पष्टपणे बोलताना अर्जुन तेंडुलकर दिसला आहे.

भारताचा स्टार क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. मात्र, अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर माैन बाळगले गेले. अखेर मुंबई इंडियन्स सोडण्यावर थेटपणे भाष्य करताना अर्जुन तेंडुलकर दिसला. अर्जुन तेंडुलकर 2021 मध्ये मुंबई इंडियन्सच्या खेम्यात दाखल झाला. तो तब्बल 2025 पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र, या इतक्या मोठ्या काळात त्याला फक्त 5 सामनेच खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्समध्ये त्याला फार काही संधी खेळण्याची मिळाली नाही. तो फक्त कायम संघाचा एक भाग होता. पण प्रत्यक्षात सामन्यांमध्ये त्याच्यावर जबाबदारी टाकली गेली नाही. पाच सामन्यात 3 विकेट घेण्यात त्याला यश मिळाले.
स्विंग गोलंदाजीमध्ये क्षमता दाखवूनही, त्याला संघात स्थान शेवटपर्यंत मिळालेच नाही.
यावर आता स्पष्टपणे बोलताना अर्जुन तेंडुलकर दिसला आहे. नुकताच अर्जुन तेंडुलकर याला विचारण्यात आले की, त्याला जास्त संधी मैदानावर मिळाल्या नाहीत, त्यावर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणाला की, कोणालाही बेंचवर बसायला आवडत नाही. हा पण आपण मेहनत करत राहायला हवे, ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल, त्यावेळी संधीचे सोने करायला हवे.
आयपीएल 2026 च्या आधी अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून लखनऊ सुपर जायंट्सकडे 30 लाख रुपयांना ट्रेड करण्यात आले. त्याने अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग नाही. आता त्याला लखनऊ सुपर जायंट्सने खरेदी केले. यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर नक्की काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
सचिन तेंडुलकर याच्या मुलाने मुंबई इंडियन्स सोडल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, अनेक वर्ष संघात असूनही त्याला संधी मिळत नव्हती. जवळपास सर्वच सामन्यात तो बेंचवर बसलेला असायचा. अर्जुन तेंडुलकर कधी खेळणार आहे की नाही. असा प्रश्नही उपस्थित केला जात. शेवटी आता मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यावर अर्जुन तेंडुलकर व्यक्त झाल्याचे बघायला मिळतंय. अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटमध्ये उतरला आहे.