Video: सामना संपताच मैदानावर जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले, भांडणाचा Video Viral
सामना संपला मैदानावर विजयाचा जल्लोष सुरु होता. आता या विजयाचा जल्लोष हा फार काळ टिकला नाही. लगेचच मैदानावर राडा पाहायला मिळाला. शनिवारी आसाम प्रीमियर लीगच्या एका सामन्यात दिब्रुगड वॉरियर्स आणि जोरहाट स्टॅलिअन्स आमनेसामने आले.

सामना संपला मैदानावर विजयाचा जल्लोष सुरु होता. आता या विजयाचा जल्लोष हा फार काळ टिकला नाही. लगेचच मैदानावर राडा पाहायला मिळाला. शनिवारी आसाम प्रीमियर लीगच्या एका सामन्यात दिब्रुगड वॉरियर्स आणि जोरहाट स्टॅलिअन्स आमनेसामने आले. सामना संपताच दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आसाम प्रीमियर लीगमधील एका सामन्यानंतर हा राडा पाहायला मिळाला. दोन खेळाडू एकमेकांला भिडले. जोरदार वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वॉरियर्सच्या साहिल जैनने विजयी शॉट मारताच, जोरहाटचा कर्णधार स्वरूपम पुरकायस्थ त्याला काहीतरी म्हणाला. नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला साहिल लगेचच संतापला आणि आपली बॅट उगारत स्वरूपमच्या दिशेने गेला. त्यांच्यात वाद सुरू झाला. स्वरूपमच्या सहकाऱ्यांनी मध्यस्थी केली, पण वाद सुरूच राहिला.
सामन्यानंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन केले आणि हा सामनाही तसाच पार पडला, पण वाद सुरूच राहिला. दरम्यान, जोरहाटचा आणखी एक खेळाडू दिब्रुगडच्या खेळाडूंना सामोरा गेला. हा खेळाडू खूपच आक्रमक दिसत होता. दिब्रुगडच्या प्रशिक्षक आणि खेळाडूंनी त्याला वेगळे केले. दिब्रुगडच्या प्रशिक्षकांनी स्वरूपमला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो अधिकच संतापला. त्याच्या संघाच्या कर्मचाऱ्यांनी स्वरूपमला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो आपल्या मतावर ठाम राहिला. मात्र, अखेरीस तो शांत झाला. यावेळी, साहिल आपल्या डगआऊटमध्ये आरामात बसून पाणी पीत होता आणि विजयाच्या आनंदात मग्न होता. दरम्यान, स्वरूपम आणि त्याचे काही सहकारी मैदानावर प्रचंड संतापले होते.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, या कमी धावसंख्येच्या सामन्यात साहिलने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. जोरहाटने प्रथम फलंदाजी करत आठ गडी गमावून 132 धावा केल्या. द्योतिमॉय नाथने त्यांच्यासाठी सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 41 चेंडूंचा सामना करत दोन चौकार आणि एक षटकार मारला. दिब्रुगडने हे लक्ष्य 17.4 षटकांत पूर्ण केले. साहिलने संघासाठी नाबाद 53 धावांची खेळी केली. त्याने 38 चेंडूंचा सामना करत चार चौकार आणि दोन षटकार मारले.