AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल, स्टीव्ह स्मिथने टीम इंडियाच्या गोलंदाजांना डिवचलं

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने भारतीय गोलंदाजांना आव्हान दिलं आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल, स्टीव्ह स्मिथने टीम इंडियाच्या गोलंदाजांना डिवचलं
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Nov 14, 2020 | 2:14 PM
Share

मेलबर्न : टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (INDIA TOUR AUSTRALIA) यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रवाना झाल्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने (Steve Smith) भारतीय गोलंदाजांना आव्हान दिलं आहे. माझ्याविरोधात जर शॉर्टपीच बॉल टाकण्याचा प्लॅन करणार असाल तर मला त्याची भीती नाही पण तुम्ही करत असलेल्या प्लॅनचा काहीही फायदा होणार नाही, असं म्हणत स्टीव्ह स्मिथने भारतीय बोलर्सला डिवचलं आहे. ( Aus Steve Smith Challenge india pacers)

“माझ्या जीवनात मी एवढ्या शॉर्टपीच बॉलचा सामना केलाय की आता मला कसलीही चिंता वाटत नाही. भारतीय बोलर्स जर माझ्याविरोधात शॉर्टपीच बॉल टाकून मला आऊट करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट भारतीय संघाला त्याचा तोटाच होईल”, असं स्टीव्ह स्मिथने म्हटलंय.

न्यूझीलंडविरुद्ध खेळताना स्टीव्ह स्मिथला नील वॅगनरने 4 वेळा शॉर्ट पीच बॉलवर बळीचा बकरा बनवलं. यावर बोलताना स्मिथ म्हणाला, “वॅगनर एक वेगळ्या दर्जाचा बॉलर आहे. त्याची पुनरावृत्ती भारतीय बोलर्स करायला गेले तर ते पस्तावतील. त्याच्यासारखी बॉलिंग टाकणं भारतीय बोलर्सला जमणार नाही. तो उत्कृष्ट बोलर आहे.”

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत गोलंदाजांमध्ये बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर भारताची  जबाबदारी असेल. बुमराह आणि शमीने याअगोदरही स्टीव्ह स्मिथला बऱ्याचदा आऊट केलं आहे. कसोटी मालिकेत बुमराह-शमी-स्मिथ यांच्यात कसा सामना रंगतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ