AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Jadeja | टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार

इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडिया विरोधात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

Ravindra Jadeja | टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार
रवींद्र जाडेजा
| Updated on: Jan 10, 2021 | 6:21 PM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात (Aus vs Ind 3rd Test) सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)दुखापतग्रस्त झाला. ही दुखापत जाडेजा आणि टीम इंडियाला चांगलीत महागात पडणार असल्याचं दिसतंय. दुखापतीमुळे जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींमधून (India vs England) बाहेर झाला आहे, त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. (aus vs ind allrounder ravindra jadeja ruled out first two test match against england)

ऑस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरोधात खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडियाविरोधात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. जाडेजा टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्यात दुखापतीमुळे मोहम्मद शमी इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे.

जाडेजाला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी दुखापत झाली होती. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जाडेजाच्या अंगठ्याला ही दुखापत झाली. स्टार्कने टाकलेला शॉर्ट पिच बोल जाडेजाने हुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने उसळी घेतली. यामुळे जाडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. जाडेजावर यानंतर रुग्णालयात स्कॅन रिपोर्ट करण्यात आलं. यात जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं.

जाडेजाला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान 5-6 आठवडे लागू शकतात. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे जाडेजाला इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकावे लागणार आहे.

जाडेजा दुसऱ्या डावात फलंदाजी करणार?

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले आहे. चौथ्या दिवसखेर टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 98 धावा केल्या आहेत. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 309 धावांची आवश्यकता आहे. टीम इंडियाचा हा सामना अनिर्णित करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे सामन्याच्या अंतिम दिवशी गरज पडल्यास जाडेजा इंजेक्शन घेऊन फलंदाजीसाठी येऊ शकतो, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा मालिकेबाहेर

Mohammad Shami | टीम इंडियाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला शमी, आता इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकणार?

England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने

(aus vs ind allrounder ravindra jadeja ruled out first two test match against england)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.