
मेलबर्न : विश्वचषक स्पर्धेतील (T20 world cup 2022) अनेक मॅचेस सध्या सेमीफायनलपर्यंत आल्या आहेत. परंतु उरलेल्या सगळ्या मॅच जोपर्यंत संपत नाहीत, तोवर नेमकी कोणती टीम सेमीफायनलमध्ये जाणार हे स्पष्ट होणार नाही. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाला (Australia) आणि आफगाणिस्तान (Afganistan) यांच्यात मॅच सुरु होणार आहे. आजच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया टीमला विजय गरजेचा आहे. कारण त्याच्या ग्रुपमधील न्यूझिलंड आणि इंग्लंड या दोन्ही टीम सेमीफायनलमध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया टीमच्या चार मॅच झाल्या आहेत. त्यापैकी दोन मॅच ऑस्ट्रेलिया टीमने जिंकल्या आहेत. तर एका मॅचमध्ये पाऊस आल्याने एक मॅच रद्द झाली आहे. न्यूझिलंडच्या टीमने ऑस्ट्रेलिया टीमचा पराभव केला आहे.
ऑस्ट्रेलिया टीम
आरोन फिंच , कॅमेरॉन ग्रीन, डेव्हिड वॉर्नर, मिच मार्श/स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड/स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझेलवुड
अफगाणिस्तान टीम
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), उस्मान घनी, इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झद्रान, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी (क), रशीद खान, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद, फजलक फारुकी