BAN vs PAK : ‘मग, आता तुझी ओवरएक्टिंग सुरु होईल’, बांग्लादेशचा हिंदू क्रिकेटर मैदानात पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानला भिडला VIDEO

BAN vs PAK : बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिकेत पाकिस्तानचा ऐतिहासिक पराभव झाला आहे. बांग्लादेशने 2-0 ने ही कसोटी मालिका जिंकली. या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्यादिवशी मैदानावर खूप ड्रामा पहायला मिळाला.

BAN vs PAK : मग, आता तुझी ओवरएक्टिंग सुरु होईल, बांग्लादेशचा हिंदू क्रिकेटर मैदानात पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानला भिडला VIDEO
BAN vs PAK 2nd Test
Image Credit source: social media
| Updated on: May 21, 2026 | 11:21 AM

बांग्लादेशने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटी सामन्यात 78 धावांनी हरवलं. पाकिस्तानला हा पराभव चांगलाचं जिव्हारी लागला आहे. सिलहटच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी मैदानावर ड्रामा पहायला मिळाला. त्यामुळे वातावरण चांगलचं तापलं होतं. पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवान आणि बांग्लादेशचा विकेटकीपर लिटन दास यांच्यात चांगलीच शाब्दीक बाचाबाची झाली. वाद इतका टोकाचा वाढला की, अंपायर्सना हस्तक्षेप करावा लागला. बांग्लादेशच्या खेळाडूंनी प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटाच्या डायलॉगवरुन रिजवानला ट्रोलही केलं. पाकिस्तानचा डाव सुरु असताना 72 व्या ओव्हरमध्ये हे सर्व घडलं. क्रीजवर मोहम्मद रिजवान 53 धावांवर नाबाद होता. त्याचवेळी त्याने साइटस्क्रीनसमोर कुठल्यातरी व्यक्तीचा वावर असल्याची तक्रार केली. खेळ थांबला. लिटन दासला वाटलं की, रिजवान बांग्लादेशी गोलंदाजांची लय तोडण्यासाठी आणि वेळ वाया घालवण्यासाठी मुद्दाम हे करतोय.

लिटनने रिजवानला विचारलं काय प्रॉब्लेम आहे. त्यावर रिजवानने उत्तर दिलं की, ‘साइटस्क्रीनसमोर कोणीतरी उभं आहे’. त्यावर लिटन दासने टोला हाणला. ‘आता याने अर्धशतक झळकवलय तर याची ओव्हरएक्टिंग सुरु होईल’. लिटन दासच्या तोंडून हे ऐकताच रिजवानचा पारा चढला. दोघांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून अंपायरने लगेच मध्ये हस्तक्षेप करुन दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रिजवानला समजवलं व लिटन दासला संयम ठेवण्याची ताकीद दिली. रिजवान क्रिकेटच्या मैदानात आपल्या ओव्हरएक्टिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे.

बॉलिवूडच्या चित्रपटातील आयकॉनिक डायलॉग मारुन डिवचलं

ओव्हर संपल्यानंतरही बांग्लादेशी खेळाडूंनी रिजवानचा पाठलाग सोडला नाही. रिजवान मैदानावर असताना विचित्र हरकती आणि नाटकं करण्यासाठी ओळखला जातो. रिजवानचं हे सर्व वागणं पाहूीन बांग्लादेशी फिल्डर्सनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटातील आयकॉनिक डायलॉग मारुन रिझवानला डिवचलं. ‘ओवरएक्टिंगसाठी याचे 50 रुपये कापले पाहिजेत’ असा रिजवानला टोमणा मारला.

पाकिस्तानचा ऐतिहासिक पराभव

बांग्लादेशने पाकिस्तान विरूद्धच्या या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केलं. 2-0 ने ही टेस्ट सीरीज जिंकली. दुसऱ्या डावात 437 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 358 धावांवर आटोपला. पाकिस्तान क्रिकेट टीमचा हा ऐतिहासिक पराभव आहे. दुसऱ्या डावात रिजवानने 94 धावा केल्या.

Follow Us