T20WorldCup | टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश ?

| Updated on: Sep 08, 2021 | 9:46 PM

बीसीसीआयकडून टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा

T20WorldCup | टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश ?
Follow us on

मुंबई : यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या T 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. यात विराट कोहली कर्णधार तर रोहीत शर्मा हा उपकर्णधार असेल. ऋषभ पंत आणि इशान किशन हे टीम इंडियाचे यष्टीरक्षक असतील. ज्यांना 15 खेळाडूंमध्ये निवडण्यात आलंय त्यात केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर,आर. अश्विन, अक्सर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीचा समावेश आहे. (bcci announces t20 world cup 2021 team virat kohli will be captain know name of all players and viral kohli squad)

महेंद्रसिंग धोनी संघाचा मेन्टॉर 

भारतीय नियमक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने टी-20 साठी खेळाडूंची यादी जाहीर केलीय. यामध्ये संघात मोठे बदल केले आहेत. ऋषभ पंत आणि इशान किशन हे टीम इंडियाचे यष्टीरक्षक असतील तर संघाचा मेन्टॉर म्हणून भारताचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी काम पाहणार आहे. म्हणजेच विराटसेनेला अनुभवी अशा महेंद्रसिंग धोनीचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या :

PHOTO: अंतिम लढतीसाठी भारताचे शिलेदार तयार, इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरमध्ये सराव करताना भारतीय संघ

पुन्हा एकदा रंगणार भारत इंग्लंड यांच्यात क्रिकेटचा थरार, वन-डेसह टी-20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

(bcci announces t20 world cup 2021 team virat kohli will be captain know name of all players and viral kohli squad)