T20 World Cup साठी भारतीय संघात ‘या’ जागांसाठी चुरस, 10 खेळाडूंमध्ये आपआपसांत स्पर्धा, कोणाला मिळणार संधी?

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ संघ बांधणीमध्ये व्यस्त आहे.

1/5
आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T 20 World Cup) भारतीय संघाची (Indian Team) घोषणा लवकरच होणार आहे. दरम्यान संघात असणाऱ्या 15 पैकी 10 खेळाडूंची नाव जवळपास निश्चित झाली असून इतर 5 जागांसाठी मोठी चुरस आहे. यात एक महत्त्वाचं स्थान म्हटलं तर मुख्य फलंदाज. टी-20 मध्ये एक मोठा स्कोर उभा करण्यासाठी कधी सलामीली तर कधी दुसऱ्या विकेटसाठी खेळणारा फलंदाज मुख्य कामगिरी निभावतो. दरम्यान भारतीय संघात विराट, रोहित, सूर्यकुमार यांच्यानंतर चौथ्या  फलंदाजासाठी श्रेयस अय्यर, इशान किशान, पृथ्वी शॉ या तिघांमध्ये कमालीची चुरस आहे.

2/5
सध्या कोणत्याही क्रिकेट प्रकारात जितके अष्टपैलू खेळाडू तितका संघाला फायदा. भारताकडे अलीकडे बरेच अष्टपैलू असले तरी टी-20 प्रकारात दोन अष्टपैलूमध्ये संघात निवडीसाठी मोठी स्पर्धा आहे. यामध्ये शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर यांची नावं आहेत. चेन्नईकडून खेळणारे दोन्ही खेळाडू अलीकडे चांगलेच चर्चेत आले आहेत. दीपकने श्रीलंका दौऱ्यात केलेली कामगिरी तर शार्दूलने इंग्लंड दौऱ्यात केलेली कामगिरी. यामुळे दोघांमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी अटीतटीची स्पर्धा आहे.

3/5
अष्टपैलू जितके अधिक तितकाच संघाला फायदा अधिक त्यामुळे दीपक आणि शार्दूल पाठोपाठ वॉशिग्टंन सुंदर आणि कृणाल पंड्या या दोघांमध्येही चुरस असणार आहे. सुंदर सध्या दुखापतीने ग्रस्त असल्याने त्याच्या निवडीची शक्यता कमी आहे. पण याच ठिकाणी कृष्णप्पा गौथमचा पर्यायही विचारात घेतला जाऊ शकतो.

4/5
पूर्वीपासून भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीच्या जादूवर अनेक सामने फिरले आहेत. आता टी-20 विश्वचषकासाठी चहलचं नाव जवळपास निश्चित असलं तरी आणखी एक फिरकीपटू म्हणून रवीचंद्रन आश्विन आणि राहुल चहर यांच्यात स्पर्धा असणार आहे. आश्विनकडे अनुभव असला तरी राहुलही नवखा असूनही उत्तम खेळ दाखवत असल्याने दोघांमध्ये निवड करणे संघ व्यवस्थापनाला अवघड जाईल हे नक्की.

5/5
केएल राहुल आणि ऋषभ पंत हे यष्टीरक्षक फलंदाज जवळपास संघात निश्चित असले तरी 15 खेळाडूंमध्ये आणखी एक यष्टीरक्षक फलंजाला संधी दिली जाऊ शकते. या जागेसाठी आयपीएल गाजवून नुकतेच भारतीय संघात पदार्पण केलेले इशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांत स्पर्धा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI