AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाईमपास म्हणून क्रिकेट खेळू लागला, वडिलांनी खेळण्यापासून रोखल्यावर प्रशिक्षक आले मदतीला, नंतर रचला इतिहास

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागतो. या क्रिकेटपटूने देखील अशाचप्रकारे संघर्ष करुन स्वत:ला एक दिग्गज क्रिकेटपटू बनवलं.

टाईमपास म्हणून क्रिकेट खेळू लागला, वडिलांनी खेळण्यापासून रोखल्यावर प्रशिक्षक आले मदतीला, नंतर रचला इतिहास
अफगानिस्तान क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 4:31 PM
Share

मुंबई : प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा खेळाडू हा आधी आपल्या एरियामध्ये क्रिकेट खेळत असतो. मग अगदी सचिनपासून ते विराट प्रत्येकानेच खेळाची सुरुवात ते रहात असलेल्या ठिकाणाहून केली. अनेकजण हे क्रिकेटर बनायचा यासाठी मोठ मोठ्या कोचिंग लावत असतात. पण आज आपण ज्या खेळाडूबद्दल बोलतोय तो खेळाडू एका शरणार्थी शिबिरामध्ये आजूबाजूला युद्धजन्य परिस्थिती असताना क्रिकेटचा सराव करुन एक दिग्गज क्रिकेटर बनला. सुरुवातीला टाईमपास म्हणून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू पुढे जाऊन देशाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बनेल असं कोणाला वाटलं ही नव्हता. पण हे करुन दाखवलं अफगानिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार नवरोज मंगलने (Nawroz Mangal). आजच्याच दिवशी 15 जुलैला 1984 मध्ये जन्म झालेल्या नवरोजची कहानी खरच इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे.

नवरोज मंगल याचा जन्म 1984 मध्ये काबूलमध्ये झाला. लहानपणी पाकिस्‍तान येथे एक शरणार्थी शिबिरात रहाणारा नवरोज टाईमपास म्हणून क्रिकेट खेळू लागला पण 2001 मध्ये अमेरिकी सेनेने अफगानिस्‍तानमधून तालिबानचे शासन संपवलं आणि नवरोजही इतरांसोबत त्याच्या मायदेशी परतला. त्याचवेळी अफगानिस्‍तान क्रिकेट संघ तयार केला जात होता अफगानिस्‍तानचे कोच ताज मलिक यांची नजर नवरोजवर पडली आणि त्यांनी त्याला संघात सामिल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण नवरोजच्या वडिलांना क्रिकेट खेळणं पसंत नसल्याने त्यांनी त्याला मनाई केली होती. त्यावेळी ताज यांनी नवरोजच्या वडिलांचे मतपरिवर्तन करण्यासाठी एक संपूर्ण रात्र त्यांना विनंती केली. तेव्हा जाऊन त्यांनी नवरोजला क्रिकेट खेळण्याची मान्यता दिली. त्यानंतर नवरोजने कायदे आजम ट्रॉफी ग्रेड टू मध्ये नौशेरा संघाविरुद्ध पदार्पण केले. त्यानंतर 2004 मध्ये एसीसी ट्रॉफीमध्ये ओमान संघाविरुद्ध आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण करत स्पर्धेत 271 धावा ठोकल्या.

स्‍कॉटलँड विरुद्ध ठोकलं पहिलं शतक

2007 मध्ये नवरोजला अफगानिस्‍तान क्रिकेट संघाचा कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर अफगानिस्‍तानला वनडे क्रिकेट टीमचा दर्जा मिळाला. 2010 च्या टी-20 वर्ल्‍ड कपमध्येही नवरोजने संघाची कप्तानी सांभाळत चांगले प्रदर्शन केले. त्यानंतर 2013 मध्ये शारजाहमध्ये नवरोजने कारकिर्दीतील पहिले शतक स्‍कॉटलँडविरुद्ध ठोकले. 2017 मध्ये आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नवरोज संघाचा  नॅशनल चीफ सिलेक्‍टर बनला. त्याने आपल्या कारकिर्दीत अफगानिस्तानकडून 49 वनडे सामने खेळले. ज्यात 27.11 च्या सरासरीने 1139 रन्स केले. ज्यात दो शतकांसह चार अर्धशतकांचाही समावेश आहे.तसेच 32 टी-20 सामन्यात त्याने 18.03 च्या सरासरीने दोन अर्धशतकांच्या मदतीने 505 रन बनवले.

हे ही वाचा :

मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?

भारतीय खेळाडूंचा अतिशाहणपणा, गरज नसताना मिरवले, आता कोरोनाने जिरवली!

(Afghanistan Legend Cricketer Nawroz Mangal birthday on this day Marathi)

Follow Us
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?