IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थानने यशस्वी जैस्वालची वादळी सुरुवात आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 7 गडी आणि 15 चेंडू राखून चेन्नईवर विजय मिळवला.

1/5
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) याने चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली. सामना जिंकवण्यात जैस्वालचा मोठा हात होता. दरम्यान या कामगिरीनंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीकडून ( MS Dhoni) यशस्वीने त्याच्या बॅटवर सही (ऑटोग्राफ) घेतली. त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर दिग्गज खेळाडू धोनीकडून जणू त्याला हे गिफ्टच मिळालं आहे.

2/5
यशस्वीने अवघ्या 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार खेचत 50 धावा या सामन्यात केल्या. त्याने आणि सलामीवीर एविन लुईसने केवळ 32 चेंडूत 77 धावांची भागिदारी करत राजस्थानला एक मजबूत सुरुवात करुन दिली. ज्याच्याच जोरावर  राजस्थान रॉयल्सने चेन्नईचे 190 धावांचे लक्ष्य15 चेंडू राखून पूर्ण केले.

3/5
दरम्यान यशस्वीला त्याच्या या सामना जिंकवण्यात महत्त्वपूर्ण असलेल्या खेळीबद्दल विचारले असता तो म्हणाला,''समोरच्या संघाने 190 धावा केल्या त्यावरुन हे कळालं, की मैदान फलंदाजीसाठी चांगलं आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अधिक धावा करण्यासाठी मी प्रयत्न केला.'' दरम्यान सामन्यानंतर धोनीकडून बॅटवर मिळालेल्या ऑटोग्राफबद्दल मी खूप आनंदी असल्याचंही यशस्वी म्हणाला.

4/5
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने देखील लुईस आणि यशस्वीने पहिल्या सहा ओव्हरमध्येच सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला होता अशी प्रतिक्रिया दिली. तसंच यशस्वी अशीच कामगिरी कायम ठेवेल अशी आशाही संजूने व्यक्त केली.

5/5
आयपीएल 2021 मध्ये यशस्वीने 29.62 च्या सरासरीने आणि 151.92 च्या स्ट्राइक रेटने 237 धावा केल्या आहेत. कर्णधार संजूनंतर राजस्थानसाठी यंदा सर्वाधिक धावा करणारा यशस्वी दुसरा खेळाडू आहे. संजूने 480 धावांचा डोंगर उभा केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI