AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: चालत्या बसमध्ये ब्राव्होचा धमाल डान्स, शार्दूलच्या बर्थ-डे पार्टीत धोनीची मस्ती, ऑस्ट्रेलियापासून ते वेस्ट इंडिजपर्यंत CSK ची हवा

आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने केकेआरला 27 धावांनी मात देत विजय मिळवला आणि सीएसकेच्या ड्रेसिंग रुममध्ये पार्टीला सुरुवात झाली. त्यातच शार्दूलचा वाढदिवस असल्याने आनंद द्गिगुणीत होता.

IPL 2021: चालत्या बसमध्ये ब्राव्होचा धमाल डान्स, शार्दूलच्या बर्थ-डे पार्टीत धोनीची मस्ती, ऑस्ट्रेलियापासून ते वेस्ट इंडिजपर्यंत CSK ची हवा
सीएसकेचा स्टार खेळाडू ब्राव्हो
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 3:48 PM
Share

दुबई: IPL 2021 चा खिताब चेन्नई सुपर किंग्सच्या नावे झाला आणि देशभरात सीएसके खासकरुन धोनी फॅन्सनी अक्षरश: उत्सव साजरा केला. तिकडे चेन्नईच्या खेळाडूंनीही मैदानापासून ते ड्रेसिंग रुमपर्यंतच नाही तर बसमध्येही धमाल केली. सीएसकेने फायनलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सला 27 धावांनी माती दिली. ज्यानंतर संपूर्ण देशभरातून नाही जगाच्या अनेक भागातून चेन्नईच्या संघाला शुभेच्छा देण्यात आल्या सोशल मीडियावर सीएसकेचीच हवा दिसून आली. त्यातच संघाचा युवा स्टार खेळाडू शार्दुल ठाकुरचाही वाढदिवस असल्याने त्याची बर्थडे पार्टीही जंगी झाली.

IPL चॅम्पिमयन होताच संघातील खेळाडूंनी हॉटेलवर पोहचून आनंद साजरा करण्याची वाटही पाहिली नाही. त्यांनी थेट बसमध्येच धमाल मस्ती सुरु केली.  चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज खेळाडू ड्वेन ब्राव्होचा बसमध्ये डान्स करत असलेला व्हिडीओ सीएसकेने त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड देखील केला आहे.

शार्दुलच्या बर्थडे पार्टीतही धमाल

बसमधून संघ हॉटेलला पोहचताच तिथेही मजा मस्ती सुरु झाली. त्यात शार्दुल ठाकुरचा बर्थडे असल्याने मग काय केकवर ताव मारुन खेळाडूंनी धमाल केली. यावेळी कर्णधार धोनी स्वत: पुढाकार घेऊन बर्थडे साजरा करत होता. यालवेळी सर्व खेळाडू नाचत होते. तर शार्दूलने केक कापताच त्याच्यावर ज्यूस आणि वेगवेगळ्या गोष्टी टाकत अगदी बच्चे कंपनीप्रमाणे मस्ती केली.

ऑस्ट्रेलियापासून वेस्ट इंडीजपर्यंत शुभेच्छांचा वर्षाव

CSK चॅम्पियन होताच त्याच्या फॅन्सनी सोशल मीडियावर अक्षरश: धिंगाणा केला. त्यात ऑस्ट्रेलियापासून ते वेस्टइंडीजपर्यंत शुभेच्छांचा वर्षाव संघावर झाला.  CSK चा माजी खेळाडू शेन वॉटसनने ऑस्ट्रेलियातून संघाला शुभेच्छा दिल्या. तर माजी दिग्गज क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यामनी वेस्ट इंडिजमधून संघाचं अभिनंदन केलं.

हे ही वाचा

IPL चं पुढचं पर्व MS धोनी खेळणार का?, जगाला पडलेल्या प्रश्नाचं धोनीने उत्तर दिलं!

T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेलची गर्लफ्रेंड भारतीय वंशाची, लवकरच लग्नबंधनात अडकणार, पाहा PHOTO

(After Winning IPL 2021 Title CSK teams party starts bravo dance in bus video dhonis fun in sharduls birthday party)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.