AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारतीय संघात निवड होताच आईवडिलांना कडकडून मिठी मारली’, 23 वर्षीय अर्जन नागवासवाला भावूक

भारतीय संघात निवड झाल्यानंतर अर्जन नागवासवाला काहीसा भावूक झाला होता. निवड झाली त्यावेळी मी घरी नव्हता. जसाही घरी पोहोचलो तशी आईबाबांना कडकडून मिठी मारली, असं अर्जनने सांगितलं. (Arzan Nagwaswalla reaction After Select In India team WTC Final 2021 India vs England)

'भारतीय संघात निवड होताच आईवडिलांना कडकडून मिठी मारली', 23 वर्षीय अर्जन नागवासवाला भावूक
अर्जन नागवासवाला
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 09, 2021 | 7:04 AM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 ( World Test Championship final) च्या अंतिम सामन्यासाठी  तसंच इंग्लंडविरुगृद्धच्या कसोटी मालिकेसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. निवड समितीने निवडलेल्या संघात राखीव खेळाडू म्हणून 23 वर्षीय गोलंदाज अर्जन नागवासवाला (Arzan Nagwaswalla) याचीही निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात निवड झाल्यानंतर अर्जन नागवासवाला काहीसा भावूक झाला होता. निवड झाली त्यावेळी मी घरी नव्हता. जसाही घरी पोहोचलो तशी आईबाबांना कडकडून मिठी मारली, असं अर्जनने सांगितलं. (Arzan Nagwaswalla reaction After Select In India team WTC Final 2021 India vs England)

23 वर्षीय अर्जनने इतिहास घडवला

मूळचा गुजराती असलेला अर्जनचं वय वर्ष केवळ 23 आहे. इतक्या कमी वयात त्याने खास इतिहास रचला आहे. 46 वर्षानंतर प्रथमच भारतीय संघात निवड झालेला तो पहिला पारशी खेळाडू आहे. अर्जन अगोदर फारुख इंजिनिअर (Farokh Engineer) भारतीय संघात खेळले होते. त्यानंतरच्या 46 वर्षांत कोणत्याही पारशी खेळाडूला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकली नाही किंबहुना पारशी खेळाडू भारतीय संघाचं दार ठोठावू शकले नाहीत. मात्र अर्जनने इतिहास घडवला.

सगळ्यात प्रथम आई वडिलांना फोन केला

टीम इंडियात निवड झाल्याचा आनंद अर्जनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शनिवारी त्याने आयएएनएसशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “ज्यावेळी माझ्या निवडीची घोषणा झाली त्यावेळी सगळ्यात आधी मी माझ्या आई वडिलांना फोन केला. त्यांना माझ्या निवडीची बातमी दिली. त्यांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. माझा हा प्रवास रोमांचित करणारा होता. ज्यावेळी मला ही बातमी समजली तेव्हा मी घरी नव्हतो. घरी आल्याआल्या मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आई-बाबांना कडकडून मिठी मारली ”

मला माझ्यावर विश्वास होता

“मी पूर्णपणे थकून गेलो होतो. एवढा थकलो होतो की मुश्किलीने मी आलेले फोन घ्यायचो. मला वाटत नव्हतं की माझी भारतीय संघात निवड होईल पण मला इतकं मात्र माहित होतं की एक ना एक दिवस माझी भारतीय संघात नक्की निवड होईल. मला माझ्यावर विश्वास होता”, असं अर्जनने सांगितलं.

क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व

अर्जन फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करतो. अर्जनने आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या लिलावसाठी अर्ज केला होता. अर्जनची बेस प्राईज 20 लाख होती. मात्र त्यानंतरही अर्जन दुर्देवाने अनसोल्ड राहिला. अर्जनने आयपीएलच्या आधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील 5 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विजय हजारे स्पर्धेतील 7 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या. त्याने शानदार गोलंदाजीच्या जोरावर सेमी फायनलपर्यंत आपल्या संघाला पोहचवलं होतं.

(Arzan Nagwaswalla reaction After Select In India team WTC Final 2021 India vs England)

हे ही वाचा :

PHOTO | धमाकेदार कामगिरीनंतरही IPL 2021 मध्ये अनसोल्ड, आता थेट इंग्लंड दौऱ्यासाठी निवड

World Test Championship final 2021 : भारतीय संघात जागा मिळवून अर्जन नागवासवालाने रचला इतिहास, 46 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या