AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | सेहवाग बनने का शौक है? हिटमॅन रोहित शर्मा ट्रोल

रोहितने 74 चेंडूत 6 चौकारांसह 44 धावांची खेळी केली.

Rohit Sharma | सेहवाग बनने का शौक है? हिटमॅन रोहित शर्मा ट्रोल
रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल
| Updated on: Jan 16, 2021 | 3:20 PM
Share

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया  (Aus vs Ind 4th Test) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर गावसकर (Border Gavskar Trophy) मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा (16 जानेवारी) दुसरा दिवस. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडिया फलंदाजासाठी आली. पहिली विकेट टीम इंडियाने लवकर गमावली. मात्र हिटमॅन रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma) चांगली फलंदाजी करत होता. रोहित अर्धशतकाच्या जवळ होता. मात्र सोप्या चेंडूवर रोहितने आपली विकेट टाकली. यामुळे रोहित सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तसेच रोहित ट्विटरवर ट्रेंड होत आहे. (aus vs ind 4th test hitman rohit sharma trolled after throwed his wicket of 44 scored)

टीम इंडियाने पहिली विकेट 11 धावांवर गमावली. युवा सलामीवीर शुभमन गिल 7 धावांवर बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारासह रोहितने टीम इंडियाचा स्कोअरकार्ड हलता ठेवला. रोहित चांगला सेट झाला होता. सामन्याचा 20 वी ओव्हर फिरकीपटून नॅथन लायन टाकायला आला. लायनने या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर फटका लगावला. तिथे उभ्या असलेल्या मिचेल स्टार्कने रोहितचा सोपा झेल घेतला. यासह रोहितने आपली विकेट कांगारुंना बक्षिस म्हणून दिली. रोहितने 74 चेंडूत 6 चौकारांसह 44 धावांची खेळी केली.

रोहित गोलंदाजाच्या चलाखीमुळे नाही तर स्वत:च्या चुकीमुळे बाद झाला. यामुळे रोहितला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं आहे. अनेक मीम्सद्वारे रोहितला ट्रोल केलं आहे.

पाहा भन्नाट मीम्स

रोहितने स्वतहून आपली विकेट गमावली. त्यामुळे रोहितचा दानवीर कर्ण असा उल्लेख करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ

पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. टीम इंडियाने 62 धावा करुन 2 विकेट्स गमावल्या. रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली. तर शुभमन गिल 7 धावांवर बाद झाला. दरम्यान कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. टीम इंडिया दुसऱ्या दिवसखेर 307 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 369 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाकडून नटराजन, सुंदर आणि शार्दूल ठाकूर या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतला.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी

Aus vs Ind 4th Test | वॉशिंग्टन ‘अतिसुंदर’, पदार्पणातील सामन्यात विक्रमाला गवसणी

(aus vs ind 4th test hitman rohit sharma trolled after throwed his wicket of 44 scored)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.