T20i World Cup 2026 स्पर्धेसाठी टीम जाहीर, अनुभवी खेळाडूचा पत्ता कट, निवड समितीच्या निर्णयामुळे आश्चर्य

Australia Sqaud For Womens T20 World Cup 2026: आगामी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा इंग्लंडकडे आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा करण्यात आली आहे.

T20i World Cup 2026 स्पर्धेसाठी टीम जाहीर, अनुभवी खेळाडूचा पत्ता कट, निवड समितीच्या निर्णयामुळे आश्चर्य
India vs Australia Womens Cricket
Image Credit source: Bcci
| Updated on: May 13, 2026 | 6:23 PM

आगामी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी (Icc T20i World Cup 2026) एक एक करुन क्रिकेट बोर्ड आपल्या देशाच्या संघाची घोषणा करत आहेत. दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी 12 मे रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेसाठी शबनीम इस्माईल हीने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर आता बुधवारी 13 मे रोजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. सोफी मोलिन्यू ही ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघातून वेगवान आणि अनुभवी गोलंदाज डर्सी ब्राउन हीला वगळण्यात आलंय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर फक्त 1 सामन्याचा अनुभव असलेल्या युवा खेळाडूची वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

डर्सीला वगळण्याचं कारण काय?

डर्सीला परिस्थितीमुळे वगळण्यात आल्याचं सिलेक्टर शॉन फ्लेगर यांनी सांगितलं. टीममध्ये उजव्या हाताने बॉलिंग करणारेच सर्व गोलंदाज असल्याने डर्सीला वगळण्यात आल्याचं निवड समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. निवड समितीने डर्सीऐवजी वेगवान गोलंदाज लुसी हॅमिल्टनला घेतलं आहे. या 20 वर्षीय खेळाडूचं गेल्या 2 महिन्यात नशिब फळफळलं आहे. लुसीचं मार्च महिन्यात टी 20i, वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण झालं.

लुसीने टीम इंडिया विरुद्ध मार्चमध्ये टीम इंडिया विरुद्ध टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20i डेब्यू केलं. त्यानंतर आता लुसीची थेट वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे. लुसीने आतापर्यंत फक्त 1 टी 20i सामना खेळला आहे.

कॅप्टन सोफीचा पहिलाच टी 20i वर्ल्ड कप

एलिसा हीली हीच्या निवृत्तीनंतर सोफीला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोफीचा कर्णधार म्हणून हा पहिलाच टी 20i वर्ल्ड कप असणार आहे. त्यामुळे सोफीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

टी 20i वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया वुमन्स टीम जाहीर

वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : सोफी मोलिन्यू (कर्णधार), एश्ले गार्डनर, ताहिला मॅक्ग्रा, निकोला कॅरी, किम ग्राथ, लुसी हॅमिल्टन, ग्रेस हॅरीस, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, अनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल आणि जॉर्जिया वॉरेहम.

Follow Us