AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रिकेटपटूंच टाईट शेड्युल, वर्षभरात तब्बल 2127 सामने खेळणार

BCCI ने यंदाच्या वर्षांतील स्थानिक क्रिकेट स्पर्धांबाबत मोठी घोषणा केली आहे. सर्व स्पर्धांचे वेळापत्रक प्रसिद्ध करत रणजी चषकासह स्थानिक स्पर्धांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेटपटूंच टाईट शेड्युल, वर्षभरात तब्बल 2127 सामने खेळणार
भारतीय क्रिकेटपटू रणजी सामने खेळताना
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 5:24 PM
Share

मुंबई : भारतीय स्थानिक क्रिकेटर्सना दिलासा देणारी एक मोठी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केली आहे. बीसीसीआयने 2021-22 या वर्षांत खेळवल्या जाणाऱ्या स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक जाहिर केले आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय क्रिकेटपटू वर्षभरात तब्बल 2 हजार 127 सामने खेळणार आहेत. या नव्या क्रिकेट वर्षाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने (Syed Mushtaq Ali Trophy) होणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे रद्द झालेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) यंदा 16 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून पुढील 3 महिने चालणार आहे. या वर्षाची सांगता विजय हजारे ट्रॉफीने होईल. जी 23 फेब्रुवारी ते 26 मार्च या दरम्यान चालणार आहे.

बीसीसीआयने शनिवारी (3 जुलै) या नव्या क्रिकेट वर्षाची घोषणा केली. या क्रिकेट वर्षाला ऑक्टोबर 2021 पासून सीनियर महिला वन डे लीग आणि सीनियर महिला वन डे चॅलेंजर्स ट्रॉफीनं सुरुवात होणार आहे. या वर्षभरात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धांदरम्यान खेळाडूच्या प्रकृतीबाबतची सर्व काळजी घेतली जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

वर्षभरात 2000 हून अधिक सामने

बीसीसीआने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 सीजनमध्ये सर्व वयांतील खेळाडूंचे मिळून 2 हजार 127 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात सर्वांत अधिक काळ रणजी ट्रॉफीची स्पर्धा चालणार आहे. तीन महिने चालणारी ही स्पर्धा झाल्यानंतर एक महिनाभर विजय हजारे ट्रॉफीची स्पर्धा चालेल.

अशा पार पडतील स्पर्धा

21 सप्टेंबर 2021: सीनियर महिला वनडे लीग

27 ऑक्टोबर, 2021: सीनियर महिला वनडे चँलेंजर ट्रॉफी

20 ऑक्टोबर – 12 नोव्हेंबर 2021 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

16 नोव्हेंबर 2021- 19 फेब्रुवारी 2022: रणजी ट्रॉफी

23 फेब्रुवारी 2022- 26 मार्च 2022: विजय हजारे ट्रॉफी

हे ही वाचा :

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

14 षटकार मारुन धावांचा पाऊस पाडला, गोऱ्या मॅम फिदा, आयुष्यभर साथ देण्याचं वचन, पाहा तो क्रिकेटर कोण?

आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO

(BCCI Announce Domestic Cricket Season Indian Players will play 2127 matches in year)

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा