वैभव सूर्यवंशीबाबत बीसीसीआयचा पुढचा प्लान काय? सचिवांनी सचिन तेंडुलकरचं नाव घेत सांगितलं की…

वैभव सूर्यवंशीने अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे. त्यासाठी बीसीसीआयने एक रोडमॅप तयार केला आहे. भविष्यातील सचिन तेंडुलकर तयार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया याने सांगितलं की...

वैभव सूर्यवंशीबाबत बीसीसीआयचा पुढचा प्लान काय? सचिवांनी सचिन तेंडुलकरचं नाव घेत सांगितलं की...
वैभव सूर्यवंशीबाबत बीसीसीआयचा पुढचा प्लान काय? सचिवांनी सचिन तेंडुलकरचं नाव घेत सांगितलं की...
Image Credit source: Money 9 वरून
| Updated on: Sep 04, 2026 | 5:30 PM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाचं मोलाचं योगदान दिलं आहे. दोन दशकं क्रिकेटच्या सेवेत देऊन अनेक विक्रम रचले आणि मोडले. त्यामुळे सचिन तेंडुलकरला क्रिकेटचं देव म्हणून संबोधलं जातं. आता भारतीय संघाचा असाच चेहरा तयार व्हावा यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. वैभव सूर्यवंशीला असंच तयार करण्याची बीसीसीआयची तयारी आहे. वैभव सूर्यवंशीचं क्रिकेट करिअर सचिनसारखं दीर्घकाळ करण्यासाठी बीसीसीआय सज्ज झाली आहे. बीसीसीआयचे सचिव सैकिया म्हणाले की, वैभव सूर्यवंशीला सचिनसारखं दीर्घकाळ खेळताना पाहण्याची इच्छा आहे. सचिनसारखी वैभवनेही देशाची सेवा करावी असं त्यांचं म्हणणं आहे. पण असं होईल का? वैभव सूर्यवंशीला सचिनइतकी पातळी गाठता येईल का? संघासाठी मॅनविनर खेळाडू ठरेल का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं पुढे मिळतील.

चांगल्या वाईट काळात तितकाच विश्वास ठेवावा: कोणताही खेळाडू हा शून्यातून घडत असतो. त्यामुळे त्याच्या कारकि‍र्दीच्या चांगल्या वाईट काळात त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. सचिन, विराट, धोनी आणि रोहितला बीसीसीआयने असाच पाठिंबा दिला होता. आता वैभव सूर्यवंशीवर तितकाच विश्वास टाकण्याची गरज आहे. तर आणि तरच मोठा खेळाडू होऊ शकतो.

कमकुवत बाजूवर काम करावं: प्रत्येक खेळाडूच्या जमेच्या बाजू आणि उणीवा असतात. त्यामुळे वैभव सूर्यवंशीने आपल्या उणीव दूर करण्याचं काम केलं पाहीजे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तग धरण्यासाठी त्याला उणीवा दूर करणं भाग आहे. आक्रमक सुरूवात करून खेळ कसा सावरायचा हे शिकणं गरजेचं आहे. सातत्यपूर्ण कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे.

फिटनेस: कोणत्याही खेळाडूला दीर्घकाळ खेळण्यासाठी प्रतिभेसोबत फिटनेस महत्त्वाचं आहे. आज अनेक दिग्गज खेळाडू फक्त आणि फक्त फिटनेसमुळे संघाचा भाग नाही. सचिन, धोनी आणि विराट फिटनेसमुळेच दीर्घकाळ खेळू शकले. दोन दशकांपेक्षा अधिक काळ खेळायचं असेल तर फिटनेसवर काम करावं लागेल.

दबावापासून दूर राहावं: वैभव सूर्यवंशीला अतिरिक्त दबावापासून दूर ठेवण्याची एक मोठी जबाबदारी बीसीसीआयवर असेल. लहान वयातच त्याच्याकडे कर्णधारपद सोपवणं हानिकारक ठरू शकते. जबाबदारीमुळे खेळात सुधारणा करणं कठीण होईल. सचिन तेंडुलकरलाही त्याच्या कारकि‍र्दीत कर्णधारपद असताना संघर्ष करावा लागला होता.

मार्गदर्शक नेमावा: वैभव सूर्यवंशीसाठी एका मार्गदर्शकाची गजर आहे. त्याला नामांकित खेळाडूंकडून मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. राहुल द्रविडने आयपीएल स्पर्धेत तसं मार्गदर्शन केलं होतं. जर मार्गदर्शक नसेल तर खेळाडूचा लक्ष्य खेळावरून विचलित होऊ शकतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us