Lakshmipathy Balaji Head Coach : आयपीएलचे हिरे घडवणारा आता टीम इंडियाचा हेड कोच, बीसीसीआयचा सर्वात मोठा निर्णय

Lakshmipathy Balaji : बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी याची इंडिया अ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Lakshmipathy Balaji Head Coach : आयपीएलचे हिरे घडवणारा आता टीम इंडियाचा हेड कोच, बीसीसीआयचा सर्वात मोठा निर्णय
Bcci Selected lakshmipathy balaji as head coach of india a team
Image Credit source: social media
| Updated on: Sep 20, 2026 | 9:37 PM

बीसीआयने भारताचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मिपती बालाजी याच्याकडे भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. पण ही जबाबदारी केवळ ‘अ’ संघापूरती आहे. 22 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरेलू आगामी मालिकेआधी हा मोठा निर्णय आला आहे. या मालिकेमध्ये दोन कसोटी सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेमध्ये भारताकडून तीन वेगवेगळे कर्णधार खेळवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, लक्ष्मिपती बालाजी सध्या 44 वर्षांचा आहे. तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 2002 मध्ये झाली. ते भारतासाठी शेवटचा सामाना 2012 मध्ये खेळला. तो एके काळी भारतीय वेगवान गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ होता. लक्ष्मिपती बालाजी गेल्या दशकापासून प्रशिक्षणात सक्रियपणे सहभागी आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांसारख्या यशस्वी आयपीएल संघांचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. दरम्यान, या मालिकेसाठी विप्रज निगमच्या जागी ऑफ स्पिनर टी वियज याला संधी देण्यात आली आहे.

लक्ष्मिपती बालाजीची यावर्षीच्या सुरुवातीलाच सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर भारत अ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याची निवड झाली आहेय यापूर्वी त्याने तमिळनाडूच्या देशांतर्गत संघाचा कोच म्हणून काम केले आहे. त्यामुळे आता अनुभवाच्या दृष्टीने विचार केल्यास आता लक्ष्मिपती बालाजी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.

भारताचा कसोटी पूर्ण संघ

अमन मोखाडे, आयुष पांडे, देवदत्त पडिक्कल (कर्णधार), साई सुदर्शन (उपकर्णधार), यश राठोड, शेख रशीद, कुमार कुशाग्र, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, अंशुल कंबोज, प्रफुल्ल हिंगे, एन जगदीसन, नचिकेत भुते, व्ही. वैश्य.

भारत एकदिवसीय संघ

प्रियांश आर्य, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड (कर्णधार), रजत पाटीदार, कुमार कुशाग्र, निशांत सिंधू, टी. विजय, अर्शीन कुलकर्णी, अर्शद खान, नमन धीर, हार्दिक पंड्या*, प्रभसिमरन सिंग, गुर्जपनीत सिंग, यश ठाकुर

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us