IPL 2026 स्पर्धेत या स्टार फिरकीपटूला खेळता येणार नाही? या संघाच्या निर्णयामुळे बीसीसीआयचा संताप

आयपीएल 2026 स्पर्धात उत्तरार्धात आली आहे. असं असताना प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. त्यात प्लेइंग 11 मध्ये तगडे खेळाडू उतरवण्यासाठी फ्रेंचायझी प्रयत्नशील आहेत. पण फिटनेसबाबत कुठेच काळजी घेतली जात नाही. त्यामुळे बीसीसीआयने संताप व्यक्त केला आहे.

IPL 2026 स्पर्धेत या स्टार फिरकीपटूला खेळता येणार नाही? या संघाच्या निर्णयामुळे बीसीसीआयचा संताप
IPL 2026 स्पर्धेत या स्टार फिरकीपटूला खेळता येणार नाही? या संघाच्या निर्णयामुळे बीसीसीआयचा संताप
Image Credit source: PTI
| Updated on: May 18, 2026 | 5:35 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी हवी तशी झाली नाही. आता फक्त औपचारिक काही सामने शिल्लक आहेत. त्यात प्लेऑफमध्ये स्थान मिळणं कठीण आहे. केकेआरने सुरूवातीच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली, पण त्यानंतर कमबॅक केलं. पण असं असूनही केकेआरचा या स्पर्धेत तितका प्रभाव पडला नाही. त्यामुळे केकेआरच्या चाहत्यांनी संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझी बीसीसीआयच्या रडारवर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स एका खेळाडूबाबत घेतलेला निर्णय बीसीसीआयला काही रूचलेला नाही. त्यामुळे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्टार फिरकीपटू वरूण चक्रवर्तीच्या फिटनेसबाबत चिंतेत आहे.

स्टार फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला दुखापत झाली असूनही त्याला जबरदस्तीने मैदानात उतरवल्याने बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला 4 षटकं टाकणं भाग पाडलं. त्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. फ्रेंचायझीच्या या निर्णयामुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. कारण वरूण चक्रवर्ती बीसीसीआयच्या सेंट्रल काँट्रॅक्टचा भाग आहे आणि लिमिटेड षटकांच्या फॉर्मेटमध्ये संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याला या आयपीएल पर्वात त्याच्या पंजाला हेयरलाइन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. वरूण चक्रवर्ती 10 सामन्यातील 9 डावात गोलंदाजी केली. त्यात त्याने 9 विकेट घेतल्या आणि 19.80 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. त्यामुळे त्याचा प्रभाव या स्पर्धेत तितका दिसला नाही.

केकेआरसाठी करो या मरोची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सविरुद्ध केकेआरने वरूण चक्रवर्तीला मैदानात उतरवलं. पण या दरम्यान वरूण दुखापतीने त्रस्त दिसला. त्यामुळे फिट नसताना खेळवल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली असून फ्रेंचायझीला खडे बोल सुनावले आहेत. रिपोर्टनुसार, सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये असलेल्या वरूण चक्रवर्तीच्या फिटनेसवर बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवणार आहे. इतकंच काय तर पुढच्या सामन्यात खेळायचं की नाही याबाबतचा निर्णयही घेणार आहे.

Follow Us