BCL 2026: ख्रिस गेलची टीम फेल, यूपी स्टार्सने नॉर्दर्न चॅलेंजर्सला 24 धावांनी नमवलं

Big Cricket League Season 2: बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या 2 पर्वातील चौथ्या सामन्यात यूपी स्टार्स आणि नॉर्दर्न चॅलेंजर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नॉर्दर्न चॅलेंजर्सकडून ख्रिस गेल मैदानात उतरला होता. पण या सामन्यात फेल गेला आणि संघही पराभूत झाला.

BCL 2026: ख्रिस गेलची टीम फेल, यूपी स्टार्सने नॉर्दर्न चॅलेंजर्सला 24 धावांनी नमवलं
BCL 2026: ख्रिस गेलची टीम फेल, यूपी स्टार्सने नॉर्दर्न चॅलेंजर्सला 24 धावांनी नमवलं
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 05, 2026 | 9:52 PM

Big Cricket League Season 2: बिग लीग क्रिकेट स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर रोमांचक होत आहे. या स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात यूपी ब्रिज स्टार्स आणि नॉर्दर्न चॅलेंजर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात क्रिकेटप्रेमींच्या नजरा या युनिवर्सल बॉस म्हणून ओळख असलेल्या ख्रिस गेलकडे होत्या. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय आणि लीग स्पर्धेत अनेक विक्रम नोंदवले आहे. त्यामुळे त्याच्याकडून तशाच खेळीची अपेक्षा होती. पण या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याने विजयी धावांचा पाठलाग करातना 14 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. त्याने फक्त 2 चौकार मारले. यूपी ब्रिजने नॉर्दर्न चॅलेंजर्सला 24 धावांनी पराभूत केलं. खरं तर या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा नॉर्दर्न चॅलेंजर्सच्या बाजूने लागला होता. कर्णधार ख्रिस गेलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. यूपी ब्रिज स्टार्सने 20 षटकात 7 गडी गमवून 166 धावा केल्या. पण नॉर्दर्न चॅलेंजर्स फक्त 142 धावा करू शकला.

बिग क्रिकेट लीग 2026 स्पर्धेत यूपी ब्रिज स्टार्सकडून चिराग गांधी आणि ब्लॅकवूडने विजयी खेळी केली. कारण अवघ्या 8 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर रोहित कृष्णन बाद झाला. त्यामुळे चिराग गांधी आणि ब्लॅकवूडने डाव सावरला. त्याच्या फलंदाजीमुळेच यूपी ब्रिज स्टार्सला 166 धावांपर्यंत मजल मारता आली. चिराग गांधीने 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 59 धावा केल्या. जरमेन ब्लॅकवूडने 43 चेंडूत 57 धावांची खेळी केली.

या खेळाडूंनी पुरस्कार जिंकले

  • सामनावीर: चिराग गांधी (यूपी ब्रिज स्टार्स)
  • सर्वोत्कृष्ट फलंदाज: चिराग गांधी (यूपी ब्रिज स्टार्स)
  • सर्वोत्कृष्ट गोलंदाज: जतीन मावी (यूपी ब्रिज स्टार्स)

उदयोन्मुख खेळाडूंवर पैशांचा पाऊस

बिग क्रिकेट लीगच्या विशेष ‘प्रो-एम’ फॉरमॅटअंतर्गत, जिथे अमेच्योर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दिग्गजांसोबत खेळण्याची संधी मिळते, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी रोख पारितोषिके देण्यात आली.

सिल्व्हर बझर विजेता (50000 रुपये बक्षीस)

भंवर (नॉर्दर्न चॅलेंजर्स – अमेच्योर गोलंदाज): त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत केवळ 2 धावांत 3 बळी घेतले.

ब्राँझ बझर विजेता (25,000 बक्षीस)

  • मुजीब (नॉर्दर्न चॅलेंजर्स – अमेच्योर गोलंदाज)
  • भंवर (नॉर्दर्न चॅलेंजर्स – अमेच्योर गोलंदाज)
  • जतिन मावी (यूपी ब्रिज स्टार्स – गोलंदाज)
  • जतीन सैनी (यूपी ब्रिज स्टार्स – अष्टपैलू)
  • सौरिन ठाकूर (यूपी ब्रिज स्टार्स – अष्टपैलू)
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us