
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा गुपचूपपणे उरकरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. अखेर सचिन तेंडुलकरने अर्जुनच्या नात्याबाबत जाहीरपणे सांगितलं. आता अर्जुन तेंडुलकरच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी सचिन तेंडुलकरने दिग्गजांच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं. अर्जुन तेंडुलकरचं लग्न 5 मार्चला होणार आहे. सानिया चंडोकसोबत लग्नगाठ बांधणार आहे. सानिया एक यशस्वी उद्योजक आहे आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवि घाई यांची नात आहे. सानिया पेट केयर ब्रँडची मालकिन आहे. लग्नाची तारीख 5 मार्च असली तरी प्री वेडिंग सेरेमनी 3 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला दिग्गज क्रिकेटपटू आणि सिनेअभिनेत्यांनी हजेरी लावली. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
लग्नापूर्वीच्या सोहळ्याला क्रीडाविश्वातील दिग्गजांनी हजेरी लावली. युवराज सिंग पत्नी हेजर कीचसोबत, हरभजन सिंग गीत बसरासोबत, इरफान पठाण पत्नी सफासोबत, युसूफ पठाण आफरीनसोबत आणि जहीर खान पत्नी सागरिका घाटगेसोबत या कार्यक्रमाला पोहोचला. यासह रवि शास्त्रीही या कार्यक्रमाला हजर होती. राजकीय विश्वातील नेते मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली. दुसरीकडे, सचिन तेंडुलकरने मुलाच्या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशातील सर्वोच्च मान्यवरांना आमंत्रित केले आहे.
#WATCH | Mumbai: Cricket legend Sachin Tendulkar, along with his family, poses for a photo at the mehendi and sangeet ceremony of Arjun Tendulkar-Saaniya Chandhok. The couple will tie the knot on March 5. (03.03.2026) pic.twitter.com/KbjS4wWxa6
— ANI (@ANI) March 4, 2026
#WATCH | Maharashtra: Former Indian Cricketer Yuvraj Singh, along with his wife and former actress-model Hazel Keech, attended the mehendi and sangeet ceremony of Arjun Tendulkar and Saaniya Chandhok, in Mumbai, on 3rd March. Arjun Tendulkar and Saaniya Chandhok will tie the knot… pic.twitter.com/wlthOQ5cUD
— ANI (@ANI) March 4, 2026
#WATCH | Maharashtra: Former Indian Cricketer Irfan Pathan, along with his wife Safa, attended the mehendi and sangeet ceremony of Arjun Tendulkar and Saaniya Chandhok, in Mumbai, on 3rd March. Arjun Tendulkar and Saaniya Chandhok will tie the knot on March 5. pic.twitter.com/GV58e3X29K
— ANI (@ANI) March 4, 2026
#WATCH | Maharashtra: Former Indian Cricketer and TMC MP Yusuf Pathan, along with his wife Afreen, attended the mehendi and sangeet ceremony of Arjun Tendulkar and Saaniya Chandhok, in Mumbai, on 3rd March. Arjun Tendulkar and Saaniya Chandhok will tie the knot on March 5. pic.twitter.com/Jxbg5wJ2QR
— ANI (@ANI) March 4, 2026
#WATCH | Maharashtra: MNS chief Raj Thackeray, along with his family, attended the mehendi and sangeet ceremony of Arjun Tendulkar and Saaniya Chandhok, in Mumbai, on 3rd March. Arjun Tendulkar and Saaniya Chandhok will tie the knot on March 5. pic.twitter.com/NREEFhy5Iz
— ANI (@ANI) March 4, 2026
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा ऑगस्ट 2025 मध्ये पार पडला होता. या कार्यक्रमाला घरातील मोजकी लोकं उपस्थित होती. अर्जुन तेंडुलकर सध्या देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नशिब पारखत आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सने त्याला मुंबई इंडियन्सकडून घेतलं आहे. त्यामुळे या पर्वात अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल.